जत्रोत्सवात जुगार खेळणे, हा देवतेचा अवमान आहे ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारे धार्मिक ठिकाणी जुगारासारखे कृत्य करतात !
सावंतवाडी – तालुक्यातील दाभील गावात जत्रोत्सवात जुगार खेळणार्या ९ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ३१ डिसेंबरच्या पहाटे धाड टाकून अटक केली. या वेळी काही जण पळून गेले. या कारवाईत पथकाने २ दुचाकी, १ चारचाकी आणि रोख रक्कम मिळून सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.
या वेळी पथकाने जुगार खेळतांना विद्याधर महादेव घाडी (दाभील), सुरेश तानाजी दळवी (विलवडे), सुधाकर दत्ताराम गाड (उगाडे), संजय कृष्णा गावडे (सरमळे), प्रकाश जगन्नाथ दळवी (विलवडे), राजेश वामन सावंत (वाफोली), सिद्धेश चंद्रकांत कुडव (इन्सुली), कृष्णा न्हानू घाडी (दाभील) आणि विजय श्रीधर परब (भालावल) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.