महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचे ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ असे नामांतर !

रतन टाटा

मुंबई – सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणार्‍या उद्योगरत्न पुरस्काराचे नामांतर ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. रतन टाटा यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक जडणघडणीमधील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने या पुरस्कारचे नामांतर ‘रतन टाटा’ यांच्या नावाने केले आहे. वर्ष २०२३ मध्ये राज्यशासनाने प्रथम ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना दिला होता.