
रत्नागिरी – शिव (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी ‘चिंतामणी’ नावाची खासगी बस पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खेड जवळील कशेडी घाटात ५० फूट दरीमध्ये कोसळली. या बसमधून २७ प्रवासी प्रवास करत होते. यातील बहुतांश प्रवासी संगमेश्वर येथील आहेत.

या अपघातातील २५ प्रवाशांना गाडीबाहेर काढण्यात यश आले असून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे नक्की कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची विनामूल्य रुग्णवाहिका, तसेच महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी कार्यरत आहेत. प्रवाशांना कळंबणी आणि पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयांत घायाळ प्रवाशांना भरती करण्यात आले आहे.
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !