सोलापूर येथे नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन करणारा फलक !

३१ डिसेंबर नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष साजरे करण्याचे धर्मप्रेमींचे आवाहन  

सोलापूर, ३१ डिसेंबर (वार्ता.) – येथील शास्त्रीनगर भागातील धर्मप्रेमी युवकांनी पाश्‍चात्त्य परंपरा मोडीत काढून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा निर्धार केला. याचाच एक भाग म्हणून धर्मप्रेमी युवकांनी एकत्र येऊन परिसरातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला न देता हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन केले. याविषयी जागृती करण्यासाठी धर्मप्रेमींनी परिसरामध्ये ‘हिंदु आणि हिंदूच रहाणार, नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार, हिंदुराष्ट्र’, असे लिहिलेला फलक लावला आहे.

हा उपक्रम सर्वश्री बालराज कैरमकोंडा, योगेश गाजुल, कार्तिक करदास, पवन मंगळारम, रोहन बुरा, शाम पेगडा, कृष्णा मासम, व्यंकटेश कुरापाटी, अरुण मासम आदी धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे राबवला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व हिंदु बांधवांतून कौतुक होत आहे.

विशेष – या धर्मप्रेमींनी परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ‘नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा’, असे आवाहन केले.