काँग्रेसने दिलेल्या यातनांतून मी अद्यापही बाहेर आलेले नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीसाठी ४ जानेवारी या दिवशी साध्वी प्रज्ञासिंह विशेष न्यायालयात उपस्थित झाल्या होत्या. त्या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

विदर्भवासियांनो, तुमच्यावर अन्याय होणार नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मी विदर्भवासियांना वचन देतो की, तुमच्यावर अन्याय होणार नाही. कुणी अन्याय करत असेल, तर ढाल बनून उभे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मंत्रालयातील उपाहारगृहाची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्यशासनाने परिपत्रक काढले

मंत्री आणि अधिकारी यांच्या कार्यालयांच्या उधारीसाठी शासनाला परिपत्रक काढावे लागणे, हे राज्यासाठी लाजिरवाणे होय !

अन्वेषण यंत्रणांना माहिती देणे, हे आमचे कर्तव्य ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

पीएमसी बँक आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

१५ जानेवारीपासून राज्यव्यापी शाळा बंद करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची चेतावणी 

देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.

कणकवली नगरपंचायत भाजीबाजाराच्या इमारतीच्या ठेकेदाराने फसवणूक केली ! – समीर नलावडे, नगराध्यक्ष

जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक !

आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहस्रोंची उपस्थिती

नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई वरिष्ठ अधिकारीन वर केली जाणार का ?

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या वाहन कर घोटाळ्यातील वाहने वापरणे अशक्य होणार

दलालाद्वारे कर भरूनही तो कार्यालयाकडे जमा न झाल्याने कर न भरलेल्या १०६ वाहनांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) रहित करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केली.

इयत्ता १२ ची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर इयत्ता १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षा विलंबानेे घेण्यात येणार आहेत.

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याचे मिरज शासकीय रुग्णालयातून पलायन

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याने ४ जानेवारी या दिवशी सकाळी ६.३० वाजता मिरज शासकीय रुग्णालयातील स्नानगृहातून पलायन केले आहे.