जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानासाठी स्थानिक सुट्टी

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ दिवशी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. हा दिवस  कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी १५ जानेवारी दिवशी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी घोषित केली आहे.