
सिंधुदुर्ग ( जि.मा.का.) – राज्यातील परभणी जिल्ह्यात कोंबड्या आणि कावळे यांचा ‘बर्ड फ्ल्यूू’ च्या संसर्गाने मृत्यू झाल्याचे शासनाने घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील कुक्कुटपालक आणि नागरिक यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
कुक्कुटपालक आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील कर्मचार्यांनी ‘पोल्ट्री फार्म’मध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा अनैसर्गिक मृत्यू होत असल्यास त्याची माहिती नजिकच्या पशूवैद्यकीय संस्थाप्रमुखांना द्यावी. कुक्कुटपालकांनी पोल्ट्री फार्मच्या परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे, नियमित सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, ४ टक्के फॉरमॅलिन, चुना लावून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !