धनंजय मुंडें यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप महिला कार्यकर्त्यांनी १८ जानेवारीला सकाळी मुंबईत आंदोलन केले. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची आणि जनतेची फसवणूक केल्याचा आरोप भाजपने केला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी महिला कार्यकर्त्यांनी केली.