Asam Corrupt Railway Officials : आसाममध्ये रेल्वेतील ७ अधिकार्‍यांनी केला ६० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार !

गेली ७ वर्षे असा प्रकार होत असणे, यातून हा भ्रष्टाचार केवळ उपमुख्य अभियंत्यापर्यंत सीमित नसणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या खात्यातील मुख्य अभियंता, अन्य वरिष्ठ अधिकारी, सरकारी मंत्री यांचीही चौकशी झाली पाहिजे !

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांना अटक करू ! – मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

श्रीरामाकडे पाठ फिरवलेले राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांच्याकडे आता जनता कायमची पाठ फिरवणार, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला गौहत्ती (आसाम) शहरात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले !

पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात झटापट !

Badruddin Ajmal: (म्हणे) ‘२० ते २६ जानेवारी या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी घरीच रहा !’  

अशा प्रकारचे विधान करून मुसलमान नेते जाणीवपूर्वक देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

Myanmar Soldiers : गृहयुद्धामुळे म्यानमारचे १५१ सैनिक भारतात पळून आले !

त्यांतील काही जण गंभीर घायाळ झाले होते. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठवण्यात येणार आहे.

जोरहाट (आसाम) येथील सैन्यतळाबाहेर बाँबस्फोट : जीवितहानी नाही !

जोरहाट येथील सैन्य तळाच्या प्रवेशद्वाराबाहेर अल्प तीव्रतेच्या बाँबचा स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Assam Action On Madarssas : आसाम सरकारने १ सहस्र २८१ मदरसे बंद करून चालू केल्या इंग्रजी शाळा !

आसाममधील भाजप सरकार असे करू शकते, तर देशातील अन्य सरकारे असे का करू शकत नाहीत ?

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

Kamakhya Temple Would be run by Pujaris : सरकार नाही, तर मंदिराचे पुजारीच पहाणार कामाख्या मंदिराचे व्यवस्थापन ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या या स्वागतार्ह निर्णयाचा आधार घेत देशभरातील हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत ! यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता कंबर कसली पाहिजे !

Karimganj Assam Temple Burnt : करीमगंज (आसाम) येथे २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी लावली आग !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !