Badruddin Ajmal : (म्हणे) ‘३०० वर्षांतही गुवाहाटीतून मुसलमानांना कुणीही बाहेर काढू शकणार नाही !’ – खासदार बद्रुद्दीन अजमल

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांचे मुख्यमंत्री सरमा यांना फुकाचे आव्हान

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा व खासदार बद्रुद्दीन अजमल

नौगाव (आसाम) – ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (ए.आय.यू.डी.एफ्.) या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि धुबरीचे खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी म्हटले आहे, ‘मियाँना (आसाममधील बंगाली मुसलमानांना मियां म्हटले जाते) गुवाहाटीमधून ३ वर्षे किंवा ३०० वर्षांत कुणीही बाहेर काढू शकणार नाही. ‘मियाँ राहिले नाहीत, तर राज्यातील कामकाज ठप्प होईल. अन्न मिळणार नाही. बांधकामे थांबतील. भाजी कुठून येणार?’, असा दावा त्यांनी केला. ते येथील रुपहीहाट येथील सभेत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांना लक्ष्य करतांना ते बोलत होते.

१. आसाममध्ये नुकताच मुसलमान विवाह कायदा रहित करण्यात आला आहे. ‘जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत राज्यात बालविवाह होऊ देणार नाही’, असे मुख्यमंत्री सरमा यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यावर बदरुद्दीन अजमल यांनी, जर मुख्यमंत्री सरमा यांनी राज्यात ८ वर्षांच्या मुसलमान मुलींचा विवाह होत असल्याचे दाखवले, तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान दिले आहे.

२. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सरमा म्हणाले होते, ‘अजमल यांना त्यांची जादू थांबवावी लागेल अन्यथा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना अटक केली जाईल.’ खासदार अजमल लोकांना त्यांच्या समस्या दूर होण्यासाठी पाणी फुंकून देतांना दिसून आले होते. लोकांना वाटते की, या पाण्यामुळे त्यांना लाभ होतो.

३. आसाममध्ये नुकताच एक कायदा संमत करण्यात आला आहे, ज्यामध्ये अशा अंधश्रद्धेतून उपचार केल्यास गुन्हा असणार आहे. या कायद्यानुसार पहिला गुन्हा केल्यास ५० सहस्र रुपये दंड आणि १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हा कारावास ३ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. यामध्ये पुन्हा कुणी दोषी आढळल्यास १ लाख रुपयांंपर्यंत दंड आणि ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

संपादकीय भूमिका

घुसखोरांना पाठीशी घालणार्‍या अजमल यांच्यासारख्या लोकांवरही कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !