Assam Muslim Child Marriage : मी जिवंत असेपर्यंत आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही ! – आसामचे मुख्यमंत्री

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची विधानसभेत गर्जना !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसामच्या विधानसभेत ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५’ रहित करण्यावर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या काँग्रेस नेत्यांना उत्तर देतांना मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा संतापून म्हणाले, ‘‘मी जिवंत असेपर्यंत आसाममध्ये लहान मुलींचे लग्न होऊ देणार नाही.

मी तुम्हाला राजकीय आव्हान देऊ इच्छितो की, मुसलमान मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही लोकांनी उघडलेले दुकान आम्ही वर्ष २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद केल्याविना आम्ही शांत बसणार नाही.’’