१. जागतिक हिंदु आर्थिक मंचाचे ध्येय
‘व्यक्ती सशक्त, धनवान आणि बुद्धीने प्रगल्भ असली की, ती समाजात उठून दिसते. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही सशक्त असली पाहिजे, हे आपले पूर्वज आणि हिंदु राजे यांनी अनेक शतकांपूर्वी दाखवून दिले होते. हिंदु समाजातील आर्थिकदृष्ट्या यशस्वी असणारे व्यापारी, बँकर, तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, उद्योगपती, व्यावसायिक व्यक्ती, अर्थतज्ञ आणि विचारवंत यांना एकत्र आणणे, जेणेकरून ते त्यांचे व्यावसायिक ज्ञान आणि अनुभव यांचे त्यांच्या सहकारी बंधूंसमवेत देवाणघेवाण करू शकेल. यातून नवोदित हिंदु उद्योजकांना प्रोत्साहन, समर्थन आणि मार्गदर्शन मिळेल. अतिरिक्त संपत्ती निर्माण करणे आणि समाज समृद्ध करणे, हे मुख्य जागतिक हिंदु आर्थिक मंचाचे ध्येय आहे.
आज काही अर्थव्यवस्था अशांत टप्प्यातून जात असतांना अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्था आपल्याला मोठ्या संधी उपलब्ध करून देत आहेत. सामूहिक वाढीसाठी जागतिक परिस्थितीचा लाभ कसा घ्यायचा, हे सूत्र आहे. हिंदूंनी जागतिक स्तरावर सहकार्य केले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये बाजारपेठ सुलभ होईल. आपल्याला संपूर्ण जगभर पसरून इतर देशांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची आवश्यकता आहे. भांडवलाच्या क्षेत्रातही अशाच प्रकारच्या सहकार्याची कल्पना केली जाऊ शकते, ज्यामुळे योग्य किमतीच्या भांडवलाची उपलब्धता शक्य होईल. यासमवेतच तांत्रिकदृष्ट्या जाणकार हिंदूंनी त्यांच्याशी जुळले पाहिजे, जे तांत्रिक नवकल्पना, कल्पना, निधी आणि बाजारपेठेतील प्रवेशासह व्यवसायात परिवर्तन आणू शकतात.
२. भारताच्या आर्थिक भरभराटीचा सुवर्ण काळ
‘धर्मस्य मूलमर्थः ।’ (चाणक्यसूत्रे, अध्याय १, सूत्र २), म्हणजे ‘धर्माचे मूळ सन्मार्गाने धन कमावण्यात आहे’, हे आचार्य चाणक्यांचे तत्त्वज्ञान आहे. हिंदूंना संपत्ती कशी निर्माण करायची, हे ठाऊक आहे. ‘शतहस्त समाहर सहस्रहस्त सं किर ।’ (अथर्ववेद, काण्ड ३, सूक्त २४, खण्ड ५), म्हणजे ‘१०० हातांनी धन अर्जित करा आणि सहस्रो हातांनी दान करा’, असे वेदांमध्ये म्हटले आहे.
१५ व्या शतकापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत हिंदूंचे ३५ टक्के योगदान होते. हिंदु संस्कृती श्रीमंत आणि संपन्न होती. हडप्पा आणि मोहेंजोदडो, लोथल, नालंदा आणि तक्षशिला विद्यापिठे होती. रामेश्वरम्सारखी भूतकाळातील आणि वर्तमानातील भव्य स्मारके होती. भारतातील बृहदेश्वर आणि मीनाक्षी मंदिरे इत्यादी श्रीमंत काळातील पुरावे आहेत. आपली अर्थव्यवस्था सशक्त आणि प्रगत होती, तसेच भारत निर्यातीत पुष्कळ पुढे होता. भारतात सोन्याचा धूर निघत असे इतका श्रीमंत देश होता. इस्लामी आक्रमण, वसाहतवादी राजवट आणि औद्योगिक क्रांती यानंतरच्या काळात ही समृद्धी नष्ट झाली. प्रत्येकाने आपापल्या परीने भारतातून सोने, नाणे, खनिजे आणि अन्य गोष्टी लुटून नेल्या. यासमवेतच येथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि विचारसरणी नष्ट केली. इंग्रजांनी गुरुकुल पद्धत नष्ट केली. धर्मांध मुसलमानांनी नालंदा, तक्षशिला आणि काशी या विद्यापिठांतील पुस्तके अन् ज्ञान देणारे ग्रंथ जाळून टाकले. ७० वर्षांनी भारतात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सरकार स्थापन झाले आणि आता कुठे जुने दिवस परत येण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत सरकारने भारताची आर्थिक स्थिती सशक्त केली आणि जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान पटकावले.
३. २१ व्या शतकातील अर्थव्यवस्थेत तरुणांचे योगदान
हिंदु लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात तरुण आहेत. त्यामुळे त्यांच्यात कुठेही कार्य करण्याची एक अंतर्निहित क्षमता आहे. त्यांच्यासाठी ‘जागतिक हिंदु आर्थिक मंच’ चांगले व्यासपीठ आहे, जो या उपलब्ध क्षमतेचा वापर करून अतिरिक्त संपत्तीच्या निर्मितीला चालना देईल. मागील २ दशकांतील आर्थिक भरभराट आणि त्यानंतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या मंदीने संपूर्ण जगाला गोंधळात टाकले आहे. जागतिक आर्थिक नेतृत्व केवळ संशोधन करत आहे आणि पारंपरिक शहाणपणानुसार कार्य करत आहे, म्हणजे खर्चात कपात आणि संरक्षणवाद जोपासत आहे. स्थिरतेसाठी सिद्ध केलेले प्रयत्न प्रतिकूल काळात कामी येत नाहीत. त्यासाठी एक नवीन प्रतिसाद आवश्यक आहे, जो जागतिक अर्थव्यवस्थेला सध्याच्या संकटातून वाचवण्यासाठी आणि अतिरिक्त संपत्तीच्या निर्मितीला चालना देऊ शकेल.
४. ‘जागतिक हिंदु आर्थिक मंचा’चा भगवद्गीतेतील मूलभूत ज्ञानावर आधारित दृष्टीकोन
आज भूक, गरिबी आणि निरक्षरता या जगाच्या मूलभूत समस्या आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या आवश्यकता आहेत. केवळ अतिरिक्त संपत्ती निर्माण करून आणि पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या लोकांना सशक्त करण्यासाठी ही संपत्ती वाटून त्यावर मात करता येते. हा आर्थिक मंच जगातील भूक, दारिद्र्य आणि निरक्षरता निर्मूलन करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
५. मुंबई येथे ‘जागतिक हिंदु आर्थिक परिषदे’चे आयोजन
अतिरिक्त संपत्तीची निर्मिती आणि वाटणी यांच्याद्वारे हिंदु समाजाच्या समृद्धीसाठी वचनबद्ध असलेली एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून हा मंच स्वतःचे वर्णन करतो. हा मंच प्रतिष्ठित हिंदु विचारवंत आणि व्यावसायिक यांना सहकार्याच्या उद्देशाने एकत्र आणतो. ही संस्था वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आणि जगाच्या विविध भागांमध्ये अनेक प्रादेशिक परिषदा आयोजित करते. परिषदेचा प्रवास वर्ष २०१२ मध्ये हाँगकाँग येथे चालू झाला. त्यानंतर वर्ष २०१३ मध्ये बँकॉक, वर्ष २०१४ मध्ये नवी देहली, वर्ष २०१५ मध्ये लंडन असे अनेक वार्षिक परिषदा यशस्वी झाल्या आहेत. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत मुंबई येथे ‘जागतिक हिंदु आर्थिक परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी अनेक सूत्र मांडली. त्यांच्या दृष्टीने भारतात असलेल्या ‘स्टॉक मार्केट’ला (समभाग विक्री बाजाराला) जगात तोड नाही. भारतीय नागरिकांचा त्यांच्या उद्योजकांवर मोठा विश्वास आहे. भारत येणार्या काही वर्षांत मोठी आर्थिक झेप घेईल. या वेळी त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘एकत्र राहू, तर सुरक्षित राहू’ या लोकप्रिय घोषणांचा उद्घोष केला.
६. हिंदूंच्या आर्थिक परिषदेमुळे पुरोगाम्यांना पोटशूळ
कोणत्याही कारणाने हिंदू एकत्रित झाले की, पुरोगाम्यांचे पित्त खवळते. या परिषदेच्या निमित्तानेही उद्योजक एकत्रित येऊन उद्योग व्यवसायातील त्यांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण करत असतांना पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. हेच पुरोगामी ५७ इस्लामी राष्ट्रे एकत्र येऊन हलाल अर्थव्यवस्था स्थापन करते, त्यांच्याविषयी बोलायचे या पुरोगाम्यांचे धाडस नाही. हलाल जिहाद, बाँबस्फोट, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, दंगली यांच्या माध्यमातून मुसलमानेतरांना संपवणे, हे धर्मांधांचे उद्दिष्ट आहे. जिहाद्यांनी सगळ्या जगात अशांतता पसरवली आहे, तरीही या धर्मांधांपुढे शेपटी टाकून हे पुरोगामी एक शब्द बोलत नाहीत, हेही तितकेच सत्य आहे.
हा मंच एक स्तुत्य उपक्रम आहे. केवळ उद्योजकांनीच नव्हे, तर शिक्षक, आधुनिक वैद्य, अधिवक्ते, व्यावसायिक आणि प्रत्येक धर्मप्रेमी यांनी एकत्र येऊन संघटन वाढवले पाहिजे. आपल्या हिंदु धर्मप्रेमींना सर्व प्रकारे साहाय्य करून त्यांना सक्षम बनवले पाहिजे. त्यामुळे हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ?, याची अनुभूती प्रत्येक हिंदु नागरिकांना येईल आणि त्यांच्या पद्धतीने ते मातृभूमीची सेवा अधिक परिणामकारक रितीने करतील, असे वाटते.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (४.१.२०२५)