सध्याच्या आधुनिकीकरणात उद़्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत.
(भाग १३)
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/837292.html
‘पाणी हे शरिराच्या प्रमुख घटकांपैकी एक असल्याने ते शरिरातील अनेक प्रक्रियांना प्रभावित करते, उदा. शरिराच्या तापमानाचे नियमन करणे, शरिराला क्षार पुरवणे इत्यादी; परंतु पाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात प्यायल्यानेच त्याचा खर्या अर्थाने लाभ होतो. ‘तहान लागल्यावर ती भागेपर्यंत पाणी पिणे’, हे सर्वसाधारणपणे योग्य असले, तरी काही वेळा ते वर्ज्य असते, उदा. जेवतांना / जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिणे. व्यायाम करतांनाही पाणी पिण्याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे.
व्यायाम करतांना निर्माण होणारी उष्णता आणि घाम यांमुळे शरीर लवकर दमते. घामावाटे शरिरातील द्रव्ये आणि महत्त्वाचे क्षारही शरिराबाहेर पडत असल्यामुळे ते भरून काढणे आवश्यक असते.
व्यायाम करतांना तहान लागल्या वर ‘१ – २ घोट पाणी पिणे’, हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरिराची कार्यक्षमता न्यून न होता व्यायामाचा लाभ योग्य प्रकारे अनुभवता येईल; मात्र व्यायाम करतांना तहान लागली; म्हणून तहान भागेपर्यंत पाणी पिणे टाळावे.’
– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (१६.९.२०२४)
भाग १४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/839821.html
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise