आरंभी केवळ १० मिनिटेच व्यायाम करा !

व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे का ? मग हे करा !

सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत.

(भाग १२)

या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/835619.html

‘प्रतिदिन न्यूनतम ४५ मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे; पण काही जणांना व्यायामाची सवय नसल्यामुळे आरंभीच ४५ मिनिटे व्यायाम करणे अवघड वाटू शकते. त्यामुळे व्यायामाला आरंभ करण्याची त्यांची इच्छा न्यून होते.

कु. वैदेही शिंदे

व्यायामाची सवय होण्यासाठी आरंभी केवळ १० किंवा १५ मिनिटेच व्यायाम करावा. १० मिनिटांचा व्यायामही प्रारंभिक टप्प्यात अत्यंत प्रभावी ठरू शकतो. आरंभी १० मिनिटांचा व्यायाम आपल्या शरिराला सहजतेने स्वीकारता येतो. त्यामुळे मनाचा अडथळा न्यून होऊन व्यायामाच्या सवयीला चालना मिळते. हळूहळू व्यायामाची सवय लागून त्याची गोडी निर्माण झाली की, व्यायामाचा कालावधी वाढवणे सोपे जाते. अशा प्रकारे १० ते १५ मिनिटांपासून आरंभ करून ४५ मिनिटांचे ध्येय गाठेपर्यंत प्रत्येक आठवड्यात हळूहळू काही मिनिटे वाढवावीत. १० मिनिटांच्या व्यायामाचा आरंभही तुमच्या आरोग्याचा पाया भक्कम करण्यास साहाय्यभूत ठरेल.’

– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (८.९.२०२४)