भाकरी करण्यासाठी मोठ्या तव्याजवळ ४ घंटे उभी असूनही साधिकेला उष्णतेचा त्रास न जाणवता तिने स्थिरता अनुभवणे

सौ. विमल गरुड

‘२.५.२०२४ या दिवशी वातावरणात पुष्कळ उष्मा जाणवत होता. त्या दिवशी स्वयंपाकघरात सर्व साधकांसाठी भाकरी करण्याची सेवा होती. मी भाकरी करण्यासाठी मोठ्या तव्याजवळ ४ घंटे उभी होते; मात्र मला उष्णतेचा त्रास जाणवला नाही. मी ही सेवा करतांना सतत जयघोष करत होते. त्या वेळी ‘प्रत्यक्ष श्री अन्नपूर्णामाताच ही सेवा माझ्याकडून करवून घेत आहे’, असे मला जाणवत होते. इतर वेळी उष्णतेच्या त्रासामुळे माझ्यात अस्थिरता वाढून माझ्या जिवाची घालमेल होते; पण या दिवशी ४ घंटे सेवा करूनही मला स्थिरता अन् शांतता अनुभवता आली. हे केवळ श्री अन्नपूर्णामातेची कृपा आणि तिचे अस्तित्व यांमुळेच शक्य झाले. ही अनुभूती दिली, यासाठी परम पूज्य गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. विमल गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक