सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
(भाग ५)
नियमित व्यायाम करण्यासाठी एक सर्वोत्तम वेळ निश्चित करा !
‘व्यायामासाठी वेळ काढायचा म्हटला, तर आपण व्यायामाला शेवटचे प्राधान्य देतो आणि आपल्याकडून व्यायाम करणे राहूनच जाते. वेळ निश्चित केल्याने ‘त्या वेळेत आपल्याला ती कृती करायची आहे’, याची आठवण होते आणि प्रतिदिन त्या वेळेत ती कृती करू लागल्यावर आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते. काही कारणामुळे अधूनमधून व्यायाम करण्याचा एखादा दिवस चुकला, तर ठीक आहे. व्यायाम शक्य तितक्या लवकर पूर्ववत् चालू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करण्यासाठी एक वेळ निश्चित करा आणि ‘निर्धारित वेळेत आपोआपच व्यायाम कसा होतो ?’, हे अनुभवून त्याचा आनंद घ्या !’
– कु. वैदेही शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (११.८.२०२४)