सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
(भाग ४)
‘व्यायामाचा लाभ सर्व वयोगटातील लोकांना होतो. खरेतर उतारवयातही व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते. कोणताही मोठा आजार नसल्यास १५ ते ८० वर्षे यांमधील कोणत्याही वयात व्यायाम केल्याने स्नायू आणि सांधे बळकट रहाण्यास साहाय्य होते, शरिराचे संतुलन सुधारून खाली पडण्याचा धोका न्यून होतो, तसेच हृदय आणि फुप्फुस निरोगी रहातात. उतारवयात निर्माण होणार्या स्नायूंच्या कडकपणावर (Stiffness वर) तर व्यायाम हा रामबाण उपाय आहे.
तुमचे वय कितीही असो, व्यायामाचा आनंद घेण्यासाठी उशीर झालेला नाही. तुमच्या स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम करण्यास आरंभ करा आणि काही शारीरिक त्रास असल्यास व्यायामाचे नवीन प्रकार चालू करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्या !’
– कु. वैदेही शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (११.८.२०२४)