पुण्यातील सारसबागेत १३ जुलै या दिवशी हिंदु बांधव जागे होऊन एकत्र आले. खरे तर तिथे बाग नंतर झाली. मुळात तेथील ‘तळ्यातील गणपति’ हे आपले श्रद्धास्थान ! तिथे चालू होत्या तशा अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवणार्यांवर खटले भरले जातील. (१२ जुलै या दिवशी सारसबागेत काही मुसलमानांनी नमाजपठण केले होते. या विरोधात हिंदूंनी एकत्र येऊन सारसबागेतील गणपति मंदिरामध्ये शिववंदना सादर केली होती.) अशांच्या साहाय्यासाठी हिंदु अधिवक्ते आणि दानशूर यांनी पुढे यायला हवे; कारण आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. प्रत्येक ठिकाणीच ‘शांतीप्रिय’ समाज घुसखोरी करतो आहे. ठिकठिकाणी मजारी (इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे), मशिदी उभ्या रहात आहेत. गड-दुर्गही त्यातून सुटलेले नाहीत. धर्मांधांचे मिळेल ती जागा कह्यात घेणे वर्षानुवर्षे चालू आहे. ‘त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे’, असे आपण म्हणतो; पण त्यांनी अत्यंत हुशारीने पावले टाकून अर्धा अधिक भारत हस्तगत केला आहे आणि ‘माझे घर सुरक्षित आहे ना, मला काय त्याचे’, या वृत्तीच्या हिंदूंना आता जाग येऊ पहाते आहे.
आपल्यावर वर्षानुवर्ष आक्रमणे होत राहिली, त्याला कारण आपले झोपी जाणे. त्यामुळे दोष आक्रमणकर्त्यांचा नाही, तर आपला (हिंदूंचा) आहे. संपूर्ण देश पोखरला गेला आहे. खरेतर उशीरच झाला आहे; पण आतातरी पूर्ण जागे होऊया. वेळोवेळी सावध राहून आवाज उठवूया, अन्यथा आपल्या पुढच्या पिढ्यांना भविष्यच उरणार नाही इतकी भीषण परिस्थिती देशात आहे. आपण हिंदू मुळात वैदिक, सनातनी, आर्यसमाजी, जैन, बौद्ध, शीख, लिंगायत असे विभागले गेले आहोतच. त्यातच आपल्याला ब्राह्मण, मराठा, कुणबी, दलित असे जातीजातींमध्येही राजकारणासाठी मुद्दाम विभागले जात आहे; पण त्यांच्यासाठी (धर्मांधांसाठी) हे राजकारणीही ‘काफर’च (मुसलमानेतरच) आहेत. जिथे त्यांचा उमेदवार नाही, तिथेच त्यांची मते तुम्हाला मिळणार आहेत. जिथे त्यांचा उमेदवार आहे, तिथे फतवे काढून एकगठ्ठा मतदान होणार आहे. राजकारण्यांना देशाचे काय होईल, याची चिंता नाही, त्यांच्यासाठी स्वत:च्या तुंबड्या भरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जातीपातीत आपल्याला विभागणार्यांकडे दुर्लक्ष करून जातपात, पंथ भेद विसरून आपण सारे एकत्र येऊया. हा देश आपला आहे आणि तो आपलाच रहायला हवा असेल, तर आता जागोजागी एकत्र यायला हवे अन् शंखध्वनी करायला हवा.
– मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. (१४.७.२०२४)