श्रीनगर – जम्मू विभागातील डोडा येथे १५ जुलैच्या रात्री झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसह ४ सैनिक यांना वीरगती प्राप्त झाली. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी, ‘आम्ही आतंकवादाचा नाश करण्यासाठी आणि प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध आहोत’, असे म्हटले आहे.
Indian Army is committed to end terrorism. – Defence Minister Rajnath Singh on Doda encounter.
Brave Indian soldiers are securing our borders at the cost of their lives, but the aggravation amongst the Indians is, how far will India spar Pakistan, that has become a safe heaven… pic.twitter.com/I3akR4gNF4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 16, 2024
राजनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्ट करतांना म्हटले, ‘डोडा येथील आतंकवादविरोधी मोहिमेमध्ये कर्तव्य बजावतांना स्वतःच्या प्राणांची आहुती देणार्या आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांसमवेत देश खंबीरपणे उभा आहे. आतंकवादविरोधी कारवाया चालू असून आपले सैन्य आतंकवादाचा नाश करण्यासाठी आणि प्रदेशात शांतता अन् सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहेत.’
संपादकीय भूमिकाभारतीय सैनिक जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करतच आहेत; मात्र आणखी किती सैनिकांनी बलीदान दिल्यावर भारत आक्रमक भूमिका घेऊन आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवणार ?, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे ! |