हिंदुत्व लोपल्याचे परिणाम !

 म. गांधी आणि जवाहरलाल नेहरू

हिंदुस्थानच्या फाळणीनंतर मुसलमानांचे पाकिस्तान हे राष्ट्र बनले, तसे येथील हिंदूंचे भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; परंतु म. गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी काही मुसलमानांना ‘इथे राहिला, तरी चालेल’, अशी सवलत दिली. त्यांच्यासाठी इथे हिंदूंच्या पैशातून सुखसुविधा निर्माण करून दिल्या. काश्मीरसारखे स्वतंत्र राज्यही त्यांच्यासाठी निर्माण केले आणि एका अयोग्य व्यक्तीच्या, म्हणजे त्यांच्याच नातेवाइकांच्या हातात तेथील राज्यकारभार सोपवला. काश्मीरला स्वतंत्र दर्जा देऊन जणू एकाच देशांमध्ये दोन पंतप्रधान निर्माण केले ! त्यांनी आपल्या धर्मांध बांधवांच्या हितासाठी हिंदूंची जीवितहानी चालू केली. म. गांधी हे जन्माने हिंदु होते; परंतु विचाराने आणि कृतीने ते धर्मांधांच्या बाजूनेच वागत होते आणि तशी कृतीही करत होते. गांधी आणि नेहरू यांनी हिंदूंना त्रास देणे आणि मुसलमानांचे भले करणे यातच आयुष्य वेचले. त्याचा परिणाम होऊन हिंदू अधिकच सहिष्णु झाले. अन्याय आणि अत्याचार सहन करत राहिले. ‘जणू काही त्यांना कुणी वाली उरला नाही’, अशी त्यांची दयनीय स्थिती झाली.

म. गांधींनी बहुमत असूनही सरदार पटेल यांना पंतप्रधान न करता जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान केल्यामुळे या देशाची फार मोठी हानी झाली. ‘एका व्यक्तीने मोठा राष्ट्रघात केला आहे’, असेच म्हणावे लागेल. त्याचा परिणाम हिंदू आजही भोगत आहेत. हिंदूंमधील जाज्वल्य हिंदुत्व हळूहळू लोप पावत गेले आणि त्यांच्यामध्ये ‘सर्वधर्मसमभाव’ ही भावना काँग्रेसने रुजवली. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही भारताची फार मोठी हानी केली. त्यांनी हिंदूंना जगणे असह्य करून सोडले. जिथे तिथे हिंदूंना दाबले आणि धर्मांधांना सवलत देत त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी धर्मांधांना लाभ देणारे अनेक चुकीचे कायदे केले. त्यामुळे हिंदु जातीजातींमध्ये विभागले गेले. त्यांच्यातील संघटितपणा नाहीसा झाला आणि फूट पडून समाज गटागटांमध्ये विभागला गेला. त्यामुळे त्यांच्यात आपापसांत भांडणे चालू झाली. त्याचा अपलाभ काँग्रेस सरकारने घेऊन मुसलमानांना जवळ केले. ‘हिंदूंना दोनच मुले पुरे’, असे शिकवून हिंदूंची लोकसंख्या न्यून केली; परंतु मुसलमानांना याविषयी मात्र सवलत दिली गेली. त्यामुळे आतापर्यंत मुसलमानांची लोकसंख्या कितीतरी पटींनी प्रतिवर्षी वाढली आहे. परिणामी मुसलमानांना विविध प्रकारचे जिहाद करणे आता सोपे जात आहे. विविध जिहादांमुळे समाजामध्ये त्यांनी एक प्रकारे दहशत निर्माण करून हिंदूंच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. हिंदुत्व लोपल्याने अनेक वर्षे हिंदू संघटितही होऊ शकले नाहीत ! ही सर्व स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.