संदेशखाली (बंगाल) येथे सत्ताधारी पक्षाकडून हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण
देहराडून (उत्तराखंड) – ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बंगाल राज्यातील संदेशखाली येथे महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाष्य केले आहे. शंकराचार्यांना या प्रकरणी प्रश्न केला असता ते म्हणाले की, अशा घटना घडणे, हे राज्याचे अपयश आहे. मुळात राज्याची स्थापना का झाली, तर दुर्बलांवर अत्याचार होऊ नयेत, यासाठी ! आपल्या माता-भगिनी आपण (राज्यकर्त्यांनी) त्यांचे रक्षण करावे, अशी अपेक्षा करतात; मात्र त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय होत असेल, तर ते राज्याचे अपयश असून ही कृती अस्वीकारार्ह आहे. विशेषतः जेव्हा एक आई किंवा बहीण (ममता बॅनर्जी) राज्यावर राज्य करते, तेव्हा हे सूत्र गंभीर बनते.
संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसचा मुसलमान नेता शेख शहाजहान आणि त्याचे कार्यकर्ते यांनी येथील हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करणार्या केंद्रीय अन्वेषण विभागाने शेख शहाजहानला अटकही केली आहे.