सनातनचे ग्रंथ वाचल्यामुळे जिज्ञासू व्यसनमुक्त होणे

‘ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवर असणार्‍या नवापूर येथे सनातनचे धर्मरथावरील (मोठ्या वाहनावरील) फिरते ग्रंथप्रदर्शन लावले होते. तेथे एक जिज्ञासू आले. ते म्हणाले, ‘‘माझी पत्नी काही कारणाने मला सोडून गेल्यामुळे माझ्या मनाची नकारात्मकता वाढली होती. ‘गावातले लोक चर्चा करत असतील, तर ते माझ्याविषयीच बोलत आहेत’, असे वाटून मला अपराध्यासारखे वाटायचे. माझा आत्मविश्वासच नष्ट झाला आणि मला दारूचे व्यसनही लागले. तेव्हा मला तुमचे हे वाहन (धर्मरथ) दिसले आणि मी सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझी व्यसनातून सुटका झाली आणि नकारात्मकतेतून बाहेर पडलो.’’ त्यांनी नंतर साधनेविषयीचे अन्य काही ग्रंथही खरेदी केले.’

–  श्री. सागर म्हात्रे, फलटण, सातारा. (ऑक्टोबर २०१९)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक