परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी गुरुमाऊलींनी साधकांच्या साधनेतील अडचणींचे निवारण केले. त्यामुळे आम्हा सर्व साधकांना अत्यंत आनंद झाला.

श्री. स्वप्नील भोसले

मी नुकतेच ‘गुरुचरित्र’ या अनुभूतीजन्य ग्रंथाचे वाचन केले होते. ‘दत्तावतारी श्रीनृसिंह सरस्वती यांनी वेळोवेळी अनेक लोकांच्या जीवनातील संकटांचे निवारण करून त्यांचा उद्धार केला’, याविषयी मी वाचले.

प.पू. गुरुमाऊलींच्या सत्संगात ‘साधकांच्या अनुभूती आणि त्यांच्या साधनेतील अडचणींवर गुरुमाऊलींनी सांगितलेल्या अचूक उपाययोजना’ यांविषयी ऐकून मला श्रीनृसिंह सरस्वतींचे स्मरण झाले. ‘एवढे महान अवतारी गुरु मला लाभले’, यासारखे सौभाग्य नाही’, असे मला वाटले.

मे मासात गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाचे नियोजन होणार आहे. मला ‘प.पू. गुरुमाऊलींचा सत्संग, म्हणजेच त्यांचा जन्मोत्सवच आहे’, अशी अनुभूती आली’, त्याबद्दल मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘हे परम कृपाळू प.पू. गुरुमाऊली, तुमची माझ्यावर अखंड कृपादृष्टी असावी आणि आपण माझा याच जन्मी उद्धार करावा’, अशी आपल्या पावनचरणी नम्र प्रार्थना आहे.’

– गुरुचरणी समर्पित,

श्री. स्वप्नील भोसले, ढवळी, फोंडा, गोवा. (४.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक