धर्मप्रसारासाठी ज्ञानबळ आणि चैतन्यबळ पुरवणारी सनातनची ग्रंथसंपदा !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) हे ‘पृथ्वीवर धर्मसंस्थापना होऊन अखिल मानवजात आनंदी व्हावी आणि सर्वदृष्ट्या आदर्श असे सात्त्विक राज्य (ईश्वरी राज्य, रामराज्य, हिंदु राष्ट्र) स्थापन व्हावे’, यांसाठी गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची वाहक असलेल्या सनातन संस्थेला आवश्यक असे ज्ञानबळ आणि चैतन्यबळ सनातनच्या ग्रंथसंपदेकडून मिळते. गुरुदेव एकदा मला म्हणाले होते, ‘‘सनातनचे ग्रंथच खरे धर्मप्रसारक आहेत !’’ त्याची प्रचीतीही येत आहे. वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !         

संकलक : पू. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक

पू. संदीप आळशी

ग्रंथांतील ज्ञानाला नियतकालिके, सामाजिक प्रसारमाध्यमे इत्यादींद्वारे प्रसिद्धी !

१. संकेतस्थळे, ‘ॲप्स’ आणि सामाजिक संकेतस्थळे यांद्वारे प्रसार : सनातन संस्था आणि संस्थेशी संलग्न संस्था, तसेच समविचारी संस्था यांची सामाजिक संकेतस्थळे (‘ट्विटर’, ‘व्हॉट्सॲप’, ‘टेलिग्राम’ इत्यादी संकेतस्थळे) आणि ‘ॲप्स’ यांद्वारे  सनातनच्या ग्रंथांची माहिती प्रकाशित केली जाते.

२. ‘यू  ट्यूब’वरून  प्रसार :www.youtube.com/user/Dharmashikshan’ या मार्गिकेवरील (‘लिंक’वरील) ‘धर्मशिक्षा’ वाहिनीवर (‘चॅनेल’वर) सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित ‘गुढी कशी उभारावी ?’, ‘उत्सव कसे साजरे करावेत ?’, ‘होळीपूजन कसे करावे ?’ अशा विषयांवरील ८ भाषांतील दृश्यपट (व्हिडिओज्) उपलब्ध आहेत. ११.५.२०११ या दिवशी चालू झालेल्या या ‘यू ट्यूब वाहिनी’ला फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३७ लाख ५७ सहस्रांहून अधिक जणांनी भेट दिली आहे.

३. नियतकालिके आणि प्रसारमाध्यमे यांद्वारे प्रसिद्धी : सनातनच्या ग्रंथांतील लिखाण देशभरातील २० नियतकालिके, २१ ‘न्यूज पोर्टल’ आणि ४० वृत्तवाहिन्या किंवा स्थानिक वाहिन्या यांद्वारे प्रसिद्ध केले जात आहे.

फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातनच्या ३६५ हून अधिक ग्रंथांच्या १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत !

१. ‘ग्रंथामुळे धर्मप्रसार कसा होतो ?’ याविषयी धर्मप्रचारक साधकाचा अनुभव

‘मला वर्ष २०१५ मध्ये उज्जैन, मध्यप्रदेश येथे होणार्‍या कुंभमेळ्यात अध्यात्मप्रसाराची पूर्वसिद्धता करतांना विविध व्यक्तींना संपर्क करण्याची संधी मिळाली. संपर्क करतांना आम्ही त्या व्यक्तींना सनातनचा ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ पहायला देत होतो. तो पाहून अनेक व्यक्तींनी आम्हाला त्यांच्या इमारतीच्या भिंतींवर धर्मप्रसार करणारे लिखाण लिहिण्याची अनुमती सहजपणे दिली. मोठे फलक लावण्यासाठी आम्हाला अनेकांनी जागाही दिल्या.’ – श्री. निरंजन चोडणकर, उज्जैन. (१८.२.२०१६)

२. ग्रंथांमुळे विविध स्तरांतील व्यक्ती सनातनशी जोडल्या जाणे

नेरूळ, नवी मुंबई येथील सौ. प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘‘सनातनच्या ‘सण, उत्सव आणि व्रते’ या ग्रंथात दिलेले सर्व शास्त्र िकती छान आहे ! आपल्याला थोडीफार माहिती असते; पण या ग्रंथाचे वाचन केल्यावर संपूर्ण माहिती मिळते.’’ अशा प्रकारे अनेक जिज्ञासू विविध विषयांवरील ग्रंथांतील त्यांना भावणार्‍या ज्ञानामुळे सनातनकडे आकृष्ट होतात आणि पुढे साधनाही करू लागतात.

३. राष्ट्रनिष्ठ आणि धर्मप्रेमी साधक घडवणारे ग्रंथ !

गुरुदेवांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथांमुळे अनेक राष्ट्रनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना ‘आदर्श असे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे’, ही काळानुसार आवश्यक समष्टी साधनाच आहे’, ही शिकवण मिळते. त्यासमवेत त्याविषयी वैध मार्गाने करायच्या कृतीच्या संदर्भातील मार्गदर्शनही मिळते. त्यामुळे सनातनचे ग्रंथ हे राष्ट्रनिष्ठ आणि धर्मप्रेमी साधक घडवणारी जणू कार्यशाळाच बनले आहेत !

४. धर्मप्रचारक संतांची मांदियाळी निर्माण करणारे ग्रंथ !

सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानामृत कृतीत आणून, म्हणजेच योग्य साधना करून २० मार्च २०२४ पर्यंत १२७ जणांनी ‘संतपद’ प्राप्त केले आहे आणि १,०५३ साधक ‘संतपदा’च्या दिशेने वाटचाल करत आहेत. सनातनचे बरेच संत आणि उन्नत साधक धर्मप्रचारक म्हणून सेवा करत आहेत. संतांच्या वाणीमधील चैतन्यामुळे, तसेच संत आणि उन्नत साधक यांच्यावर असलेल्या ईश्वरी कृपेमुळे सनातनचे अध्यात्मप्रसाराचे कार्य अनेक पटींनी वाढत आहे.

५. ग्रंथांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे जिज्ञासू साधनेकडे वळणे

सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे ?’, हे जाणून घ्यायची जिज्ञासा असते. त्यांना अध्यात्मातील एखाद्या गोष्टीमागील शास्त्र समजावून सांगितले की, त्यांचा अध्यात्मावर लवकर विश्वास बसतो आणि ते साधनेकडे वळतात.

सनातनच्या अध्यात्मविषयक ग्रंथांत अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे ?’ यांची शास्त्रीय उत्तरे दिली आहेत. बहुतांशी ग्रंथांत ‘न भूतो न भविष्यति ।’, असे सखोल ईश्वरी ज्ञानही दिलेले आहे. सनातनच्या ग्रंथांत जीवन आनंदी होण्यासाठी केवळ साधनेचे तात्त्विक विवेचनच नव्हे, तर साधना कृतीत आणण्याविषयीही मार्गदर्शन केले आहे. ग्रंथ वाचकांच्या साधनेतील अडथळे दूर करून त्यांच्या साधनेला दिशाही देतात. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे जिज्ञासूंना सनातनचे ग्रंथ आवडतात आणि त्यांचा अभ्यास करून ते साधना करायला लागतात.

६. ग्रंथांतील चैतन्यामुळेही जिज्ञासू साधनेकडे वळणे

गुरुदेवांसारख्या उच्च कोटीतील आध्यात्मिक विभूतीच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले सनातनचे ग्रंथ चैतन्यमय आहेत. त्यामुळेच त्यांतील शिकवण वाचकांच्या मनावर दृढ संस्कार करून जाते आणि वाचक आपोआपच कृतीला, म्हणजे साधनेला उद्युक्त होतात.

६ अ. मुद्रणालयातील कामगारांनाही ग्रंथांतील चैतन्यामुळे अनुभूती येणे : ‘वर्ष २०११ पासून सनातन संस्थेचे ग्रंथ कोल्हापूर येथील ८ मुद्रणालयांमध्ये मुद्रित करण्यात येत आहेत. सनातनच्या ग्रंथांचे मुद्रण करतांना तेथील अनेक कामगारांना विविध अनुभूती येतात. त्यामुळे त्यांची सनातन संस्थेवरील श्रद्धा वाढली आहे.’ – श्री. संतोष गावडे, कोल्हापूर. (३१.३.२०१८)

७. सनातनच्या ग्रंथांविषयी समाजातील संत-महंतांचे अभिप्राय ! 

७ अ. ‘आताच्या मेकॉलेप्रणीत परकीय शिक्षणपद्धतीमुळे आजची पिढी हिंदु धर्माच्या आचार-विचारांपासून लांब गेली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंना धर्मज्ञान मिळण्यासाठी सनातनने जे धार्मिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत, ते कौतुकास्पद आहेत !’ – श्री श्री श्री सद्गुरु ब्रह्मानंद सरस्वती महाराज, श्रीराम क्षेत्र महासंस्थान, कन्याडी, दक्षिण कन्नड.

७ आ. ‘मी सनातनचे ग्रंथ वाचले आहेत. त्यांतील धर्मशिक्षण चांगले असते. हे ग्रंथ इतरांनी वाचावेत, यासाठी मी कीर्तनातून प्रबोधन करत असतो.’ – ह.भ.प. दिगंबरबुवा नाईक, नागपूर (दैनिक ‘सनातन प्रभात’, १४.११.२०१३)

७ इ. ‘प्रयागराज येथील कुंभमेळ्यात लावलेले सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल. विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी असे प्रदर्शन लावून तुम्ही हिंदूंना जागृत करत आहात. हा चांगला भाग असून या कार्यात मीही तुम्हाला सहकार्य करीन.’ – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा (दैनिक ‘सनातन प्रभात’, ३०.१.२०१९)

८. सनातनच्या ग्रंथांविषयी हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांचे अभिप्राय !

८ अ. ‘आम्ही जयपूर, वाराणसी आणि धनबाद येथे एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना भेटलो. त्यांना सनातन संस्थेचे ग्रंथ दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘आजपर्यंत आम्ही केवळ कार्यच करत होतो. धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि शास्त्र यांविषयी आम्हाला काही ठाऊक नव्हते. आम्हाला आता या ग्रंथांमुळे भावपूर्ण कार्य करता येईल.’’- स्मिता सुबोध नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.४.२०१४)

८  आ. ‘सनातनचा ‘देवनदी गंगेचे रक्षण करा !’ हा ग्रंथ म्हणजे ‘Its not a book. Its thesis !’, अर्थात् ‘हा ग्रंथ नव्हे, तर एक शोधनिबंध आहे !’ – श्री. अश्वनीकुमार च्रोंगू, ‘पनून कश्मीर’, जम्मू.

सनातनच्या ग्रंथांविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांचे अभिप्राय !

सनातनचा ग्रंथ म्हणजे जीवनाचे सोने करणारा परीस !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे लोखंडाचे सोने करणार्‍या परिसाप्रमाणे आहेत. हे ग्रंथ वाचून अनेकांनी त्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट झाल्याची अनुभूती घेतली आहे. या ग्रंथांतून आपल्या जीवनाला गुरुभक्ती आणि ईश्वरभक्ती यांचा परीसस्पर्श होतो अन् ते आपले जीवन उजळवून टाकतात.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी

सनातनचे ग्रंथ ‘ब्रह्मांडातील गुरुतत्त्व’ म्हणून कार्यरत रहातील !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘सनातनच्या ग्रंथांद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जिज्ञासूंच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अव्यक्त संकल्प कार्यरत झाला आहे. त्यामुळे ‘जे ग्रंथांतील मार्गदर्शन सर्वांगांनी कृतीत आणतील, त्यांची आध्यात्मिक उन्नती होणार’, हे निश्चित आहे. ईश्वरप्राप्तीपर्यंतचे मार्गदर्शन करणारे हे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे ‘ब्रह्मांडातील गुरुतत्त्व’ म्हणून अखंड कार्यरत रहातील !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी


‘सनातनच्या ग्रंथांमुळे धर्मप्रसार कसा होतो ?’ याविषयी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा अनुभव

सद्गुरु स्वाती खाडये

‘आम्ही एकदा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोवा यांना लहान मुले आणि विद्यार्थी यांच्यासाठी आवश्यक असलेले सनातनचे ग्रंथ दाखवले. ते पाहिल्यानंतर श्री. श्रीपाद नाईक यांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांनी स्वतःसाठी या ग्रंथांचे २ संच विकत घेतले. या वेळी ते म्हणाले, ‘‘समाजाला आवश्यक असलेल्या सर्वच विषयांवर सनातन संस्थेने ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांची समाजाला पुष्कळ आवश्यकता आहे. मी माझ्या परीने हे ग्रंथ समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन.’’ त्यांचा २०० शाळांमध्ये ग्रंथांचा संच देण्याचा मानस असून त्यांनी आम्हाला प्रत्येक मासामध्ये २५ शाळांमध्ये संच देण्यास सुचवले.’’

–  सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.