सनातन संस्था वैयक्तिक (व्यष्टी) साधना करण्यासह समष्टी साधनेचीही शिकवण देते. समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न ! यासाठी सनातन संस्थेच्या वतीने विविध अध्यात्मप्रसारक उपक्रम आयोजित करण्यासमवेत अनेक समाजोपयोगी उपक्रमही राबवण्यात येतात. व्यसनमुक्तीसाठी प्रवचने, विनामूल्य आरोग्य शिबिरे, मंदिर स्वच्छता, गरजूंना कपडे, धान्य, वह्या यांचे वाटप करण्याचेही सामाजिक कार्य सनातन संस्था करते. सनातनच्या आश्रमांत धर्मरक्षणासाठी यज्ञयागही करण्यात येतात. कुंभमेळे, तसेच विविध मंदिरांचे उत्सव यांमध्ये धर्मशिक्षण देणारी प्रदर्शने, आध्यात्मिक ग्रंथांची प्रदर्शने, प्रवचने आदींद्वारे व्यापक धर्मप्रसार करण्यात येतो. वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेद्वारे धर्मप्रचारक, तसेच सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांना व्याख्याने अन् प्रसारमाध्यमे यांमध्ये हिंदु धर्माची वैचारिक बाजू मांडण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. देवालय-दर्शन, देवतांची उपासना, साधना इत्यादी विषयांवरील २५० हून अधिक धर्मशिक्षण फलकांची निर्मिती आणि या फलकांच्या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येऊन त्याद्वारे समाजाला धर्मशिक्षण दिले जाते. त्याच समवेत सनातन संस्थेच्या वतीने हिंदु संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे संवर्धन होण्यासाठी देशभरात प्रतिवर्षी १०० हून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. अशा काही समाजहितैषी उपक्रमांची ओळख छायाचित्रांद्वारे करून घेऊया.
धर्मरक्षणासाठी यज्ञयाग
अध्यात्मावरील प्रवचन
गुरु-शिष्य परंपरा जोपासणारे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ !