न्यूयॉर्क (अमेरिका) – लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद पाकच्या कारागृहात ७८ वर्षांची शिक्षा भोगत आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध समितीने दिली आहे. हाफिज सईद १२ फेब्रुवारी २०२० पासून कारागृहात आहे. एकूण ७ आतंकवादी कारवायांच्या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे.
(सौजन्य : oneindia news)
भारताने हाफीज सईद याला भारताकडे सुपुर्द करण्याची मागणी भारत सरकारने केली होती. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी ही माहिती प्रसारित केली आहे. पाकिस्तानच्या विशेष आतंकवादविरोधी न्यायालयाने सईद याला शिक्षा सुनावली होती.