भारताच्‍या दृष्‍टीने आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण

१. हीच वेळ का ?

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

‘कतार देशाने भारताच्‍या नौदलाच्‍या ८ माजी अधिकार्‍यांना मृत्‍यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.  कतार आणि हमास आतंकवादी संघटना यांचे संबंध जुने असून तो हमासला आर्थिक अन् राजकीय साहाय्‍य करतो. कतार-तुर्कीये-पाकिस्‍तान हे मैत्रीचे जुने त्रिकूट आहे. इस्रायल आणि हमास यांच्‍या संघर्षात भारताने इस्रायलला पाठिंबा घोषित केला आहे. नौदलाच्‍या माजी अधिकार्‍यांना शिक्षा सुनावून कतारचा भारतावर दबाव आणण्‍याचा प्रयत्न आहे.

२. भारताचा हमासविरुद्ध इस्रायलला पाठिंबा योग्‍यच !

जगात सध्‍या ‘सुव्‍यवस्‍थेची शक्‍ती’ (फोर्सेस ऑफ ऑर्डर) विरुद्ध ‘अराजक शक्‍ती’ (फोर्सेस ऑफ डिसऑर्डर) असा संघर्ष चालू आहे. ‘अराजक शक्‍तीं’मध्‍ये ‘हमास’, ‘जैश’, ‘लष्‍कर’ आणि ‘इसिस’ यांसारख्‍या आतंकवादी संघटनांचा समावेश आहे. जर इस्रायल आणि हमास यांच्‍या संघर्षात हमास जिंकले, तर ‘जैश’ अन् ‘लष्‍कर’ यांची शक्‍ती वाढेल, ज्‍याचा त्रास भारताला होईल. त्‍यामुळे भारताचा हमासविरुद्ध इस्रायलला पाठिंबा योग्‍यच आहे.’

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्‍ट्रीय धोरणांचे विश्‍लेषक (२७.१०.२०२३) (साभार : डॉ. देवळाणकर यांचे फेसबुक)