बलात्कार रोखण्यासाठी देशात शरीयत कायदा लागू करा ! – एस्.टी. हसन, खासदार, समाजवादी पक्ष

समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांची मागणी !

एस्.टी. हसन

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशातील बलात्कारांच्या घटना रोखण्यासाठी शरीयत कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. ‘या कायद्यामुळे सौदी अरेबियामध्ये मुसलमानांच्या संदर्भात एकही गुन्हा घडत नाही’, असा दावा त्यांनी केला. तसेच त्यांनी अश्‍लील संकेतस्थळांवर (पॉर्न साईटवर) बंदी घालण्याचीही मागणी केली. भारतात अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आलेली आहे.

१. खासदार एस्.टी. हसन म्हणाले की, गावाकडे ४ मुले शेतात बसून भ्रमणभाषवर अश्‍लील चित्रपट पहातात आणि जेव्हा त्यांच्या समोरून एखादी मुलगी जाते, तेव्हा ते तिच्यावर बलात्कार करतात. जेव्हा अश्‍लील चित्रपट पाहिले जातात, तेव्हा शरिरात एक प्रकारचे हार्मोन्स (संप्रेरके) निर्माण होता आणि त्यातून ते बलात्कार करण्यास प्रवृत्त होतात. यातून गुन्हे घडतात. यामुळेच देशात अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घातली पाहिजे.

२. खासदार हसन पुढे म्हणाले की, बलात्काराच्या अशा घटना रोखण्यासाठी शरीयत कायद्यानुसार शिक्षा दिल्यास एक प्रकारचा धाक निर्माण होईल आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना थांबतील. सौदी अरेबिया देशामध्ये बलात्कार, चोरी, हत्या आदी घटना का होत नाहीत ? कारण अशा गुन्ह्यांवर कठोर शिक्षा करण्याचे कायदे आहेत. आपल्या देशात कायदे लवचिक असल्याने त्याला अपलाभ लोक उठवतात. काही वेळेस तर बलात्काराचे खोटे आरोपही केले जातात. बलात्काराच्या कलम ३७६ चा दुरुपयोग केला जातो.

संपादकीय भूमिका 

एस्.टी. हसन यांची मागणी प्रथम मुसलमान गुन्हेगारांसाठी लागू करावी. त्याद्वारे बलात्कार, धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, जिहादी आतंकवाद, दंगली आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी मुसलमान आरोपींना शिक्षा व्हावी. असे केल्यास देशातील बहुतांश गुन्हेगारी अल्प होईल, असेच कुणालाही वाटेल !