‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे काफिरांचा द्वेष आणि इस्‍लामची वाढ !

‘इस्‍लाम हा केवळ एक धर्म नव्‍हे, तर ती एक जीवन पद्धत आहे. जीवनातील असा कोणताही पैलू नाही की, तो त्‍याला अस्‍पर्श आहे. केवळ मुसलमानांसाठी नव्‍हे, तर इस्‍लाम न मानणार्‍या म्‍हणजे काफिरांविषयीही इस्‍लामचे निश्‍चित निर्देश आहेत. ते मुसलमानांसाठी ऐच्‍छिक नसून बंधनकारक आहेत. राजकीय इस्‍लाम, जिहाद आणि शरीयत यांची याचसाठी निर्मिती करण्‍यात आलेली आहे. जर निर्देशांचे उल्लंघन केले गेले, तर जिवंतपणी महंमद पैगंबरचे अनुयायी कठोर दंड देतीलच; पण मेल्‍यानंतरही अल्लाकडून नरकात (जहन्‍नूम) आगीचे चटके खावे लागतील.

१. इस्‍लाममध्‍ये प्रेम आणि द्वेष यांविषयी देण्‍यात आलेले निर्देश

याच आधारावर इस्‍लाममध्‍ये प्रेम आणि द्वेष यांविषयीही निर्देश देण्‍यात आले आहेत. अरबीमध्‍ये त्‍याला ‘अल वला वल बारा’, असे म्‍हणतात. प्रत्‍येक मुसलमानाला अल्लाच्‍या म्‍हणण्‍यानुसारच प्रेम किंवा द्वेष ठेवावा लागतो, तसा विचार आणि व्‍यवहार ठेवावा लागतो. कुराण (९-२३,२४) मध्‍ये स्‍पष्‍टपणे सांगितले आहे, ‘‘हे मुसलमानांनो, अल्लावर विश्‍वास न ठेवणार्‍या, म्‍हणजे धर्मद्रोह (कुफ्र) करण्‍यास सिद्ध असलेल्‍या आपल्‍या पित्‍यास किंवा भावासही तुम्‍ही आपले मानू नका. तुमचे पिता, भाऊ, पत्नी, सगेसोयरे, संपत्ती, व्‍यवसाय, घरदार हे सर्व जर तुम्‍हाला अल्ला आणि त्‍याच्‍या प्रेषितापेक्षा, म्‍हणजे जिहादपेक्षा अधिक प्रिय असतील तर लक्षात ठेवा. अल्ला निश्‍चित तुमचा हिशोब करेल (दंड देईल).’’ असाच उल्लेख कुराणात (६०-१,३) अन्‍य ठिकाणी आहे, ‘‘माझ्‍या इमानदारांनो (मुसलमानांनो), माझ्‍या शत्रूंना आणि आपल्‍या शत्रूंना आपले म्‍हणू नका. जे अल्लाचे म्‍हणणे नाकारतात ते आपले शत्रू आहेत…..लक्षात ठेवा ! कयामतच्‍या दिवशी तुमचे नातेवाईक तुमच्‍या उपयोगी पडणार नाहीत.’’

२. ‘कुराण’, ‘हदीस’ आणि ‘सीरा’ या ग्रंथांमध्‍ये प्रेम अन् द्वेष यांविषयी सांगितलेली सूत्रे

याचा अर्थ ‘अल्ला आणि त्‍याच्‍या प्रेषितांना मानणार्‍यांसह तुम्‍ही आत्‍मीयतेचा भाव ठेवू शकता’, हाच आहे. ‘अल वला’ म्‍हणजे हाच प्रेमसंबंध ठेवण्‍याचा आधार आहे. कुराणमधील १३ आयतांमध्‍ये हे वारंवार सांगितले गेले आहे की, गैरमुसलमानांशी मुसलमान स्नेहाचे संबंध तर सोडाच; पण साधी मैत्रीसुद्धा करू शकत नाही. याच्‍या उत्तरार्धात, म्‍हणजे ‘अल बारा’ यात सांगितले आहे की, अल्ला ज्‍याचा द्वेष करतो, त्‍याचा मुसलमानांनीही द्वेष केला पाहिजे. असे न करणार्‍या मुसलमानांना अल्ला दंडित करील. ‘कुराण’, ‘हदीस’ (पैगंबरच्‍या कार्याचे कथन), तसेच ‘सीरा’ (पैगंबरच्‍या जीवन चरित्र) यांमध्‍ये ‘अल्ला आणि त्‍यांचे पैगंबर (प्रेषित) हे काफिरांची घृणा करतात, ते काफिरांचे शत्रू आहेत’, याचा उल्लेख असंख्‍य वेळा आलेला आहे. इस्‍लाममध्‍ये कायदेशीर व्‍यवहार कसे केले जावेत ? हे ठरवणार्‍या शरीयतमध्‍येही हेच सांगितले आहे.

डॉ. शंकर शरण

३. अल्लाच्‍या मर्जीनुसारच प्रेम किंवा द्वेष ठेवण्‍याविषयी इस्‍लामी ग्रंथात नमूद केलेली सूत्रे

या प्रकारे कहाणी, करणी, विश्‍वास आणि मनुष्‍य या सर्व गोष्‍टी ‘अल वला वल बारा’ यात अंतर्भूत आहेत. या चारही गोष्‍टींविषयी अल्लाच्‍या मर्जीनुसारच प्रेम किंवा द्वेष ठेवणे आवश्‍यक आहे. अल्ला ज्‍यामुळे प्रसन्‍न होतो, त्‍या गोष्‍टी पुढीलप्रमाणे आहेत –

अ. अल्लाचे स्‍मरण करणे.

आ. जिहाद करणे.

इ. अल्ला हाच एकमेव ईश्‍वर यावर विश्‍वास ठेवणे.

ई. अल्लाला मानणार्‍यांवर प्रेम करणे.

ज्‍यांच्‍याविषयी अल्लाच्‍या मनात द्वेष आहे, त्‍या गोष्‍टी पुढीलप्रमाणे आहेत –

अ. चुगली करणे.

आ. व्‍यभिचारी, मूर्तीपूजक, अल्लाला अन्‍य देवतांच्‍या समान मानणे.

इ. अल्लाला न मानणे.

याचा अर्थ ‘काफिरांविषयी कोणत्‍याही प्रकारची सद़्‍भावना ठेवणे, हे अल्लाला आणि त्‍याच्‍या प्रेषितांना मान्‍य नाही. ज्‍याविषयी अल्लाला आणि त्‍याच्‍या प्रेषितांना प्रेम आहे, त्‍यावरच मुसलमानांनी प्रेम केले पाहिजे अन् ज्‍याविषयी अल्लाला, तसेच त्‍याच्‍या प्रेषितांना द्वेष आहे, ते ज्‍याची निर्भत्‍सना करतात, त्‍याची मुसलमानांनी घृणा केली पाहिजे, त्‍याची निर्भत्‍सना केली पाहिजे.’ ही गोष्‍ट इस्‍लामच्‍या तिन्‍ही मूळ ग्रंथात ठासून ठासून सांगितलेली आहे. कुराणमधील अर्ध्‍यापेक्षा अधिक जागा तर याच विचाराने व्‍यापली आहे की, काफीर हे वाईट, घाणेरडे घृणास्‍पद असतात. काफिरांविषयी कुराणात कुठेही एकही चांगला शब्‍द किंवा सहानुभूती व्‍यक्‍त करण्‍यात आलेली नाही. काफिरांविषयी अल्ला आणि मुसलमान यांच्‍या मनात केवळ घृणा नव्‍हे, ‘तीव्र घृणा’ आहे (कुराण ४०-३५).

४. ‘सीरा’मध्‍ये मानण्‍यात आलेला महाभयंकर अपराध !

ही घृणा चुकीचा व्‍यवहार, कृती किंवा स्‍वभावाची नाही, तर ते फक्‍त अल्लाला आणि त्‍याच्‍या प्रेषितांना मानत नाहीत म्‍हणून आहे. ‘सीरा’मध्‍ये याविषयी वर्णन आहे की, अशा कैक सुसंस्‍कृत आणि चारित्र्यवान लोकांना इस्‍लामने ठार केले; कारण त्‍यांनी केवळ अल्लाला एकमात्र ईश्‍वर मानण्‍यास अन् महंमदाला त्‍यांचा प्रेषित मानण्‍यास नकार दिला, म्‍हणजे घृणा ही व्‍यक्‍तीगत गोष्‍ट नसून तो सरळ सरळ इस्‍लामला न मानणार्‍यांशी जोडलेला आहे. इस्‍लाममध्‍ये हत्‍या, लोकसंहार, बलात्‍कार, चोरी, दरोडा किंवा लहान मुलांशी दुराचारासारख्‍या गुन्‍ह्यांना मोठे अपराध मानले जात नाही, तर इस्‍लामच्‍या दृष्‍टीने सर्वांत गंभीर गुन्‍हा, म्‍हणजे इस्‍लामचा त्‍याग करणे, म्‍हणजेच ‘मुसलमानाचा काफीर बनणे’, हाच अल्लाच्‍या दृष्‍टीने महाभयंकर अपराध आहे.

५. काफिरांचा विश्‍वासघात करणे, हा इस्‍लामच्‍या दृष्‍टीने अपराध नसणे

एखाद्या काफिराशी प्रेम करणे तर फार दूरची गोष्‍ट, सहज साधे हितसंबंध ठेवणेही इस्‍लामच्‍या कायद्याने गुन्‍हाच ठरतो. जर एखाद्या मुसलमानाने एखाद्या काफिराशी खरोखरचे मैत्रीचे संबंध ठेवले, तर तो धर्मद्रोह (कुफ्र) ठरतो. हो; पण इस्‍लाममध्‍ये मैत्रीचा देखावा करण्‍याची अनुमती आहे. काफिरांचा विश्‍वासघात करणे, त्‍यांच्‍या विरुद्ध षड्‍यंत्र रचणे, त्‍यांना अपमानित करणे, हा इस्‍लामच्‍या दृष्‍टीने अपराध समजला जात नाही; कारण अखेर इस्‍लामच्‍या दृष्‍टीने काफिरासमोर दोनच पर्याय असतात, ते म्‍हणजे इस्‍लाम मान्‍य (मुसलमान बनणे) करणे किंवा मृत्‍यूला सामोरे जाणे.

६. भारतातील लव्‍ह जिहादविषयी… :

भारतात ‘लव्‍ह जिहाद’ प्रकरण ख्रिस्‍ती मिशनर्‍यांमुळे उजेडात आले. अनेक वर्षांपासून कॅथोलिक बिशप ‘काँसील’, ‘सीरियन मलबार चर्च’ यांसारख्‍या संस्‍था याविषयी  क्षुब्‍ध (क्रोध) आहेत. केरळमधील ‘इस्‍लामिक पॉप्‍युलर फ्रंट’ या मुसलमान संघटनेची विद्यार्थी शाखा ‘कॅम्‍पस फ्रंट’ने असंख्‍य ख्रिस्‍ती आणि हिंदु तरुणींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात फसवून त्‍यांचे धर्मांतर केलेले आहे. कॅथोलिक बिशप काँसीलच्‍या म्‍हणण्‍यानुसार गेल्‍या दोन दशकांत तेथे लव्‍ह जिहादची शिकार झालेल्‍या तरुणींची संख्‍या सहस्रोंमध्‍ये आहे. सर्वांत पहिल्‍यांदा कम्‍युनिस्‍ट (साम्‍यवादी) पक्षाचे मुख्‍यमंत्री अच्‍युतानंदन यांनी यावर भाष्‍य केले. ते म्‍हणाले, ‘‘एक इस्‍लामी संघटना ‘मनी (पैसा) आणि मॅरेज (लग्‍न)’ यांद्वारे केरळला संपूर्णपणे इस्‍लामिक बनवण्‍याची योजना राबवत आहे.’’

७. …तर काफिरांचा विनाश आणि इस्‍लामची वाढ होण्‍यास फार वेळ लागणार नाही !

अशी परिस्‍थिती असतांना भारतातील काही हिंदुत्‍वनिष्‍ठ नेते सशस्‍त्र जिहादविषयी मूग गिळून गप्‍प बसतात. ‘उलट मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत’, असे म्‍हणत त्‍यांचे तोंड भरून कौतुक करतात. भारतातील सर्व १४२ कोटी जनता जर हिंदूच असेल, तर लव्‍ह जिहादसारखी समस्‍याच येथे संभवत नाही. ज्‍या देशातील काफिरांचे नेतृत्‍व असे आदर्श विचारांचे असते, तिथे काफिरांचा विनाश आणि इस्‍लामची वाढ व्‍हायला फार वेळ लागत नाही.’

– डॉ. शंकर शरण, देहली.

(साभार : ‘नया इंडिया’चे संकेतस्‍थळ आणि ‘सांस्‍कृतिक वार्तापत्र’)

मुसलमानांचा धर्म आणि कर्तव्‍ये काय ?

इस्‍लामचा ‘अल वला वल बारा’ हा सिद्धांत काफिरांविषयी असलेल्‍या कोणत्‍याही प्रकारच्‍या सहानभूतीला किंवा आत्‍मीयतेला संपुष्‍टात आणतो. व्‍यक्‍तीगत स्‍तरावर जशी ही गोष्‍ट आहे, तशीच ती राष्‍ट्रीय स्‍तरावर ‘दार उल इस्‍लाम’ (जेथे इस्‍लामचे शासन चालते, असा प्रदेश) आणि ‘दार उल हरब’ (युद्धभूमी. जेथे इस्‍लामचे शासन चालत नाही, असा प्रदेश) या सिद्धांतात आहे. याचा अर्थ जगात ‘इस्‍लामला समर्पित झालेले देश आणि जे अजून समर्पित झाले नाहीत’, दोनच प्रकारचे देश आहेत. जसे जिहादद्वारे ‘दार उल हरब’ला ‘दार उल इस्‍लाम’ बनवणे, हा मुसलमानांचा धर्म आणि कर्तव्‍य आहे, तसेच केवळ मुसलमानावर प्रेम अन् काफिरांची घृणा करणे, हेही त्‍यांचे धर्म आणि कर्तव्‍य आहे. राजकीय आणि व्‍यक्‍तीगत या दोन्‍ही संबंधांविषयीची कसोटी ही अल्ला अन् त्‍याच्‍या प्रेषितांचा स्‍वीकार करणे, केवळ हीच आहे. याच कारणामुळे कोणत्‍याही काफिराला मुसलमानाशी लग्‍न केल्‍यावर इस्‍लाम स्‍वीकारावाच लागतो. जरी तो कितीही मोठा श्रीमंत अथवा प्रतिष्‍ठित काफीर असला तरीही ! अभिनेत्री शर्मिला टागोरलासुद्धा आएशा बेगम बनावेच लागले. हाच जगाचा इतिहास आहे.

इस्‍लाम हा केवळ औपचारिक सिद्धांत नाही. जिहाद आणि शरीयत यांच्‍याद्वारे तो लागू करण्‍याची ‘फुलप्रूफ’ (बिनधोक) व्‍यवस्‍थाही करण्‍यात आलेली आहे. ज्‍या ठिकाणी असे घडतांना दिसत नाही, त्‍या ठिकाणी मुसलमानांचे शासन नसते, तेथे त्‍यांची शक्‍ती अल्‍प असते किंवा ते संख्‍येने अल्‍प असतात; पण ही स्‍थिती कायमस्‍वरूपी नसते. मागील १ सहस्र ४०० वर्षांचा इतिहास सांगतो आहे की, ज्‍या समाजात इस्‍लामने प्रवेश केला, कालांतराने त्‍या समाजाचे अस्‍तित्‍वच समाप्‍त झाले. हिंसा, शोषण, प्रलोभन, छळ, दडपण, अपमान, लाचारी अशा विविध कारणांमुळे अखेर काफिरांचे अस्‍तित्‍व संपुष्‍टात येते. याची अरबस्‍तानपासून युरोप, आफ्रिका, आशियापर्यंत शेकडो उदाहरणे पहायला मिळतील. मग त्‍याला अनेक वर्षे, दशके लागेनात का ! काश्‍मीर हे त्‍याचे उत्तम उदाहरण आहे. अपमानित झालेले काफीर यावर चर्चा करत नाहीत, लाजेखातर ते गप्‍प बसतात आणि इस्‍लाम मात्र या परिस्‍थितीचा अपलाभ उठवत दबाव वाढवत स्‍वतःचे हातपाय पसरत रहातो.

संपादकीय भूमिका 

‘लव्‍ह जिहाद’ला पूर्णपणे पायबंद घालण्‍यासाठी इस्‍लामी शिकवणुकीचे खरे स्‍वरूप समजून घेणे आवश्‍यक !