समाजद्रोही आणि अनैसर्गिक समलैंगिक विवाह !

१. समलैंगिक विवाह हे कायदा आणि समाज या दोहोंच्या दृष्टीने अनैतिक !

‘भारतामध्ये विवाह न करता दोन लोकांनी शारीरिक संबंध ठेवणे आणि त्या हेतूने त्यांनी एकत्र रहाणे, हे कायदा आणि समाज यांना आरंभीपासूनच अमान्य आहे. वर्ष २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ला (विवाह न करता एकत्र रहाण्याला) कायदेशीर मान्यता दिली. वर्ष २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रहित करून समलिंगी असणार्‍यांना शारीरिक संबंध ठेवण्याची मान्यता दिली. ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ हे श्रद्धा वालकरसारख्या प्रकरणांसाठी (श्रद्धा वालकर प्रकरण म्हणजे देहलीत श्रद्धा नावाच्या मुलीची तिचा अफताब नावाच्या मुसलमान प्रियकाराने हत्या करून तिचे ३५ तुकडे केल्याची घटना) निमित्त बनू लागले आहे. त्याच प्रकारे पुढे समलिंगी विवाहही अनेक समस्यांचे निमित्त बनू शकते. समलिंगींच्या जोडीने दत्तक घेतलेल्या मुलाशी ते नीट वागतील, याची निश्‍चिती आहे का ? समलिंगी विवाहातून मुले जन्माला येऊ शकत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक आणि प्रचलित भारतीय विवाह परंपरा मान्य असणार्‍या लोकांनी स्वतःची मुले समलिंगी जोडप्यांना दत्तक देऊ नयेत. असे केल्यास त्यांच्या मुलांचे लैंगिक शोषण होऊ शकते. जे नैसर्गिक विवाह परंपरेच्या बाजूने नाहीत, त्यांना मुले दत्तक अधिकार मिळणे हास्यास्पद आणि अव्यवहार्य आहे.

२. जीव-जंतू आणि प्राणी यांच्याहून नीच पातळी गाठणारा मनुष्य !

निसर्गातील सर्व जीव-जंतू नैसर्गिक संबंधांच्या नियमांचे पालन करतात. त्याहीपुढे जाऊन आपल्याला असे दिसेल की, सर्व जीव-जंतू तेव्हाच शारीरिक संबंध प्रस्थापित करतात, जेव्हा त्यांना प्रजोत्पादन करायचे असते. झाडे-झुडपेही प्रजनन करतात; परंतु त्यामागेही पुष्प, फळे आणि बीज उत्पन्न करणे, हाच हेतू असतो. जीवांमध्ये ‘व्हेजिटेटिव्ह’ (अलैंगिक) प्रजननही वंश वाढवण्यासाठीच होते. ‘पार्थेनोजेनेसीस’ (नर-मादी यांच्या संयोगाखेरीज प्रजोत्पादन) हेही एक अलैंगिक प्रजनन आहे; परंतु त्याचाही उद्देश प्रजोत्पादन करणे हाच आहे.

३. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ असे नैसर्गिक विवाह !

अनैसर्गिक संबंध अशास्त्रीय, अनैतिक आणि असामाजिक आहेत; कारण त्यांना समाजमान्यता नाही. पाश्‍चात्त्य आणि मध्य आशियाई देशांचे हे अनुकरण आता भारतातही रूढ करण्याचा प्रयत्न करणे, हे भारतीय प्रथा आणि परंपरा यांच्या विरुद्ध आहे. भारताने जगाला विवाह नावाची पद्धत आणि कुटुंब नावाचे संघटन दिले आहे. त्यामुळे भारतीय समाज जगात अद्वितीय आहे. नैसर्गिक विवाहामुळे कुटुंब नावाची संस्था निर्माण होते आणि त्यातूनच उत्तम समाजाची निर्मिती होते. भारतीय समाजाचे हे वैशिष्ट्य पाहूनच जगातील अन्य पंथीयसुद्धा भारतीय विवाहपद्धत स्वीकारू लागले आहेत. नैसर्गिक विवाह समाजाला नैसर्गिक रूप देतात. प्रकृतीच्या विरोधातील गोष्टी या खोट्या आहेत. जे सत्य आहे, तेच सुंदर आहे आणि तेच नैसर्गिक आहे. सत्य, सुंदर आणि कल्याणकारी हेच शिव आहे. जीव शिवाला अनुरूप नैसर्गिकपणे वागल्यास त्याला यश आणि कीर्ती लाभते.

४. पूर्णत: अमान्य असणारे समलैंगिक विवाह !

भारतीय समाज कसेही जीवन जगण्याच्या बाजूचा नाही. तो जीवन यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करतो. तो यशाचे कीर्तीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत असतो. भारताच्या महत्त्वकांक्षेने मिळवलेले यश मोठे असून त्यासमोर आकाशही ठेंगणे आहे; मात्र हे यश नैसर्गिक आहार-विहार आणि जीवनशैली यांवरच अवलंबून आहे. काही अभिजात वर्गाच्या लोकांच्या विकृतींना कायदेशीर मान्यता दिल्याने भारताची नैसर्गिक न्याय-परंपरा बाधित होईल. नैसर्गिक न्याय हा आजच्या न्यायव्यवस्थेतही अतीमहत्त्वाचा आहे. समलैंगिक विवाह अनैसर्गिक असल्याने ते पूर्णत: अमान्य आहेत.’

– श्री. विजय शंकर तिवारी

(साभार : मासिक ‘हिंदु विश्‍व’, १ ते १५ मे २०२३)