हिंदु विचारांची चुकीची व्याख्या आणि त्याला खोट्या गोष्टी जोडण्याचे काम विदेशी लोकांनी कळत नकळत चालू केले. त्यामध्ये चर्चच्या धर्मप्रचारकांनी प्रमुख भूमिका बजावली. नंतर स्वतंत्र भारतात राजकीय पक्षांनी स्वार्थापोटी त्याचा मनाप्रमाणे दुरुपयोग केला आणि दुष्प्रचार वाढवला, तसेच प्रामाणिक गोष्टीही दाबून ठेवल्या जाऊ लागल्या; कारण त्या पक्षाच्या स्वार्थाला प्रतिकूल ठरत होत्या. अशा पद्धतीने आपल्याच हाताने हिंदु समाजाच्या एका भागाकडून दुसर्या भागाला विरोधी बनवले जात आहे. अशाच प्रकारे ‘स्पृश्य-अस्पृश्य’ या शब्दाची स्थिती केली आहे. भारतावर मुसलमानांच्या आक्रमणांनंतर देशात मुसलमान समाज सिद्ध झाल्यानंतर या शब्दाचा वापर चालू झाला. त्यापूर्वी लौकिक व्यवहारामध्ये हा शब्द नव्हता. इथे स्पर्शास्पर्शाचा (स्पृश्य-अस्पृश्य) प्रारंभ कसा झाला ? याचा शोध घेणे आवश्यक होते; परंतु इस्लामी इतिहासाची वास्तविकता लपवण्यासाठी त्या काळात त्याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले नाही. याच्या बदल्यात हिंदूंची निंदा करण्याची योजना केली गेली, याचे उदाहरण स्पर्शास्पर्श याला वेद आणि मनुस्मृति यांच्या माथी मारले गेले.
१. हिंदु समाजात स्पृश्य-अस्पृश्यता पहिल्यापासून सापडत नसणे
वास्तविकपणे ध्यानयोगामध्ये यम-नियम आहेत. यासाठी हिंदू काही स्थानांना विशेष पवित्र ठेवत होते आणि काही गोष्टींपासून वाचत होते. यामध्ये बाहेरील, घरातील सदस्यांशी असलेले व्यवहार अंतर्भूत आहेत. विदेशी याला ही स्पृश्य-अस्पृश्य मानतात. उदा. भोजन उष्टे करू नये, उष्टे न खाणे किंवा पिणे, अंघोळ केल्याविना स्वयंपाकघरात प्रवेश न करणे, बाहेरून आल्यावर हात-पाय धुवूनच घरात येणे, चप्पल घराच्या बाहेर ठेवणे इत्यादी. अनेक हिंदु स्वतःच स्वयंपाक करणारे म्हणजे आपल्या हाताने बनवलेले खाणारे होते. महाकवी निराला (सूर्यकांत त्रिपाठी) हे त्याचे समकालीन उदाहरण आहे. असे करणे, हे एक स्वतःला घालून दिलेले शासन (शिस्त) होते; परंतु हिंदु विचारांना दुसर्या जातीच्या नजरेने पाहिल्यावर या गोष्टी स्पृश्य-अस्पृश्यतेविषयी आहेत, असे वाटते. तसे पाहिल्यास हिंदू समाजाच्या सामाजिक व्यवहारात स्पृश्य-अस्पृश्यता पहिल्यापासून सापडत नाही. याचे ठोस प्रमाण म्हणजे विदेशी लोकांनी भारतात राहिल्यानंतर लिहिलेले प्रत्यक्षदर्शी विवरण आहे.
२. इसवी सन पूर्वीपासून पुढे २ सहस्र वर्षांपर्यंत स्पर्शास्पर्शचा (स्पृश्य-अस्पृश्यचा) उल्लेख न आढळणे
इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये मेगास्थनीज, हुएन सांग, अल बरूनी, इब्न बतूता यांपासून १७ व्या शतकातील चार्ल्स बर्नियरपर्यंत २ सहस्र वर्षांतील भारतीय जीवनपटाचे वर्णन पहा. त्यांनी ब्राह्मण आणि हिंदू समाजाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; परंतु कुणीही इथे स्पर्शास्पर्श (स्पृश्य-अस्पृश्य) बघितला नाही. याखेरीज देशातील साहित्याचे अवलोकन केले, तर आपले विशाल साहित्य आहे. प्रसिद्ध भाषाविद आणि ‘एन्सायक्लोपिडिया ऑफ हिंदुईझम्’ याचे ११ खंड लिहिणारे लेखक प्राध्यापक कपिल कपूर यांनी भारतातील १ सहस्र वर्षांच्या भक्ती साहित्याचा अभ्यास केला आहे. त्यांना असे दिसून आले की, बहुतांश भक्त कवी ब्राह्मण किंवा सवर्ण नव्हते; परंतु संपूर्ण हिंदु समाजाने त्यांची पूजा केली. त्या कवींनी आपल्या अनेक सामाजिक त्रुटींवर बोट ठेवले; परंतु कुणीही स्पर्शास्पर्शाचा उल्लेख केलेला नाही.
३. हिंदूंच्या असात्त्विक पदार्थ न खाण्या-पिण्यावरून त्यांना असहिष्णू ठरवणे
वेगळ्या जीवनपद्धती किंवा खाणे-पिणे या कारणाने काही समूहांची वेगळे रहाण्याविषयीची माहिती मिळते; परंतु त्यामुळे यात कुठेही बळजोरी नव्हती. वेगळ्या वस्तीमध्ये रहाणे, ही दुसरी गोष्ट आहे. आजही वनवासी, मासेमारी किंवा असामान्य भोजन करणारे वेगळ्या वस्तीमध्ये रहातात; परंतु आज हिंदूंचे सात्त्विक खाणे-पिणे याला त्यांच्या विरोधात हत्यार बनवून त्यांची वस्ती कह्यात घेण्याच्या तंत्रामध्ये पालटले गेले आहे. उदा. गोमांस खाणे आणि शिजवण्याचे जाणूनबुजून प्रदर्शन करून शेजारच्या हिंदूंना तिथून पळून जाण्यास विवश करणे, हे दृश्य जम्मूपासून मैसुरूपर्यंत अनेक शहरांमध्ये दिसून आले आहे. देहलीमध्ये गेल्या ३ दशकांमध्ये अनेक वस्त्या हिंदु लोकांनी रिकाम्या केल्या; परंतु यावर कुणी आक्षेप घेत नाही आणि कुणी आक्षेप घेतलाच, तर एखाद्याच्या खाण्याच्या सवयीविषयी असहिष्णुता असल्याचा दोष हिंदूंनाच दिला जातो. म्हणून प्राचीन, तसेच वर्तमान स्थितीतील सर्व उदाहरणांवरून हिंदु जीवनपद्धतीतील स्वच्छतेविषयी संकेत देतात; परंतु महाभारतात अश्वत्थाम्याने पांडवांच्या मुलांची हत्या केल्याने त्याला ब्राह्मण ‘अस्पृश्य’ म्हणत होते, असा उल्लेख सापडतो. आजही आपल्या जमातीतील कुणी अयोग्य काम केले, तर त्याला दंड म्हणून वाळीत टाकल्याविषयीची उदाहरणे सापडतात. या काळात स्पर्शास्पर्श याचा जन्म झाला.
४. परकीय आक्रमकांच्या काळात हिंदूंना मैला उचलावा लागल्याने हिंदु समाज दूर होणे
याचे मुख्य कारण मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर त्यांनी हिंदु जीवनाचा केलेला भयानक विध्वंस होता. आक्रमकांची शिकार झालेल्या अनेक हिंदूंना आपल्याच समाजापासून उपेक्षा सोसावी लागली. अनेक ठिकाणी अनन्वित छळ आणि ब्राह्मणांची हत्या झाल्याने हिंदू आपले सहज जीवन आणि मार्गदर्शन यांपासून वंचित झाले. बहुतांश लोकांनी कोणत्याही मार्गाने धर्म कुटुंब वाचवण्याविषयी चिंता केली. अनेक वेळा अपमान, बलात्कार आणि अपहरण यांच्या धमकीमुळे त्यांना मुसलमानांचे गुलाम बनून रहावे लागेल, अशी भीती होती. काहींनी दुसर्या जातीतील शासकांचा मैला उचलणे यांसारखी कामे करण्याच्या बदल्यात हिंदु म्हणून रहाण्याची अनुज्ञप्ती मिळाली. याचा परिणाम म्हणजे ते हिंदु राहिले; परंतु इतर समाजापासून दूर गेले. अमृतलाल नागर यांच्या ‘नाच्यो बहुत गोपाल’ या कादंबरीमध्ये एक ब्राह्मण स्त्रीची कथा याच पार्श्वभूमीवर आहे. आजही पाकिस्तानमध्ये हे दृश्य आपल्याला दिसेल. भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानने तेथील हिंदूंना भारतात येण्यापासून बळजोरीने थांबवले. त्यांचे म्हणणे होते की, त्यांचा मैला कोण उचलेल ? स्वतः मुसलमान आपला मैला उचलणार नाहीत. या प्रत्यक्ष उदाहरणानंतर हिंदु समाजाला दोष देणे, हे मूर्खपणाचे किंवा क्रौर्यतेचे आहे.
५. हिंदुविरोधी किंवा साम्यवाद्यांनी ‘रामचरितमानस’मधील श्लोकावरून हिंदु धर्मावर आरोप करणे
कोणतेही हिंदु शास्त्र किंवा पुराण यांमध्ये जातीवर आधारित स्पृश्य-अस्पृश्यता असा उल्लेख नाही. तसे असते, तर सर्व हिंदुविरोधी किंवा डाव्या (साम्यवादी) विचारसरणीच्या लोकांनी त्याचा फलक लाखो वेळा फडकावला असता. याच्या बदल्यात ते शंबूक किंवा एकलव्य यांच्या कथेचा वापर करतात अथवा अन्य अशा प्रकारचे प्रसंग वापरून त्याला वेगळा रंग देऊन हिंदु धर्मावर आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या दोह्याची ओळ ‘ढोल, गंवार, शुद्र, पशू, नारी । सफल ताडना के अधिकारी ॥’ (भावार्थ : प्रभूंनी मला जी शिक्षा केली ते पुष्कळ चांगले झाले आणि चांगला मार्ग दाखवला. आपणच सर्व जिवांची मर्यादा (स्वभाव) निर्माण केली आहे. ढोल, अशिक्षित, शूद्र, पशू आणि स्त्री हे सर्व शिक्षणास पात्र आहेत.) हे तसेच एक उदाहरण आहे की, ज्याचा अर्थ मनाप्रमाणे लावला गेला आहे. ‘रामचरितमानस’ या ग्रंथातील ‘सुंदरकांड’मधील ५९ व्या दोह्यामध्ये या दोन ओळी आहेत. जेव्हा रामाच्या कोपाने भयभीत समुद्र क्षमाचायना करत आहे; परंतु प्रथम हे वाक्य नायकाच्या तोंडी नाही, तर खलनायकाच्या तोंडी आहे.
दुसरे म्हणजे या दोह्याच्या आधी समुद्राने ‘गगन समीर अनल जल धरती । इन कई नाथ सहज जड करनी’, असेही म्हटले आहे, म्हणजे समुद्राने वायु, अग्नि, जल आणि भूमी यांना स्वभावानुसार जड असे म्हटले आहे. दोन्ही गोष्टी एक प्रकारात आहेत. याच प्रकारे या चार मोठ्या देवीदेवताही ढोल, गंवार, शूद्र, पशू, नारी यांच्या श्रेणीमध्ये येतात. म्हणून पूर्ण श्रेणी ‘ताडन के अधिकारी’ असे मानून त्याला खलनायकाचा कुतर्क समजावे किंवा शूद्र, पशू, नारी यांना भूमी, अग्नि, वायु आणि जल यांच्याप्रमाणे गतकाळातील मानावे. केवळ शूद्र आणि नारी या गोष्टी घेऊन त्याला मनाप्रमाणे रंग देण्यासाठी हा प्रपंच केला आहे.
६. स्पृश्य-अस्पृश्यतेला नष्ट करण्याचे काम वेदांनी प्रेरित असलेल्या महापुरुषांनी करणे
म्हणून शास्त्र किंवा लोक, भूतकाळ अथवा वर्तमानकाळ, देशी किंवा विदेशी यांमध्ये कुठेही स्पृश्य-अस्पृश्य हिंदु धर्माचे अंग असण्याचा किंवा ब्राह्मणांच्या दुष्टतेचे प्रमाण नाही. नंतर या स्पृश्य-अस्पृश्यतेला नष्ट करण्याचे काम हिंदु समाजात झाले. स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद, स्वामी श्रद्धानंद यांसारख्या महापुरुष योद्ध्यांची पूर्ण साखळी आहे, ज्यांनी विदेशी प्रकोपातून आलेली ही वाईट पद्धत दूर करण्याचा विडा यशस्वीपणे उचलला; कारण ते सर्व वेदांनी प्रेरित होते.
७. नेते आणि प्रसारमाध्यमे स्पृश्य-अस्पृश्याविषयी करत असलेला अपप्रचार थांबवतील का ?
स्पष्ट सांगायचे झाल्यास वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नाही. ते लिहिणारे अत्यंत विचारवंत लोकांना भुलवण्यासाठी नाटक करणारे कोणत्याही पक्षाचे नेते नव्हते. त्यांनी केवळ दुष्काळात आलेल्या आपल्या धर्माच्या विरोधात असणार्या वाईट रिती नष्ट केल्या. जरी स्पृश्य-अस्पृश्यता धर्माला अनुरूप असती, तर अगणित हिंदु विद्वान आणि संन्यासी यांनी त्याविरुद्ध विडा उचलला नसता. यासाठी आम्हाला आपली परंपरा आपल्या शास्त्रानुसार जाणून आणि समजून घेतली पाहिजे. आतापर्यंत आम्ही ‘कावळा कान घेऊन गेला’, अशी समजूत करून घेऊन दुसर्यांकडून होणार्या निंदेमुळे आपलीच छाती बडवत आहोेत. आपल्याला आपल्या शास्त्रांच्या कसोटीवर त्याकडे पाहिले पाहिजे. कमीत कमी कोरोना महामारीच्या भीतीनंतर हात जोडून नमस्कार, शारीरिक स्पर्शापासून वेगळे रहाणे, चप्पल घराबाहेर ठेवणे, शाकाहार स्वीकारणे, क्रौर्यतेने सिद्ध केलेल्या ‘हलाल’ मांसाहारापासून दूर रहाणे इत्यादी सूचना सर्व जगाला मिळाल्या आहेत. यानंतरही आपले नेते आणि प्रसारमाध्यमे स्पृश्य-अस्पृश्याविषयी केला जाणारा खोटा प्रचार थांबवतील का ?
– डॉ. शंकर शरण, देहली. (१.३.२०२३)
(साभार : www.cisindus.org आणि ‘नया इंडिया’)
संपादकीय भूमिकावैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा ! |