कलियुगात सर्वांनी भगवंताचे नामस्‍मरण केले पाहिजे ! – भारतीयम् सत्‍यवाणी

राष्‍ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने धर्मपुरी (तेलंगाणा) येथे ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन

धर्मपुरी येथील भारतीयम् सत्‍यवाणी

भाग्‍यनगर (तेलंगाणा) – आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्‍यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्‍यावर ईश्‍वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्‍मरण केल्‍याने अत्‍यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो. त्‍यामुळे आपण सर्वांनी अधिकाधिक नामस्‍मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन धर्मपुरी येथील भारतीयम् सत्‍यवाणी यांनी केले. राष्‍ट्रीय शिवाजी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने चंदानगरच्‍या धर्मपुरी येथे ‘हिंदु धर्मजागृती सभा’ आयोजित केली होती. त्‍यात त्‍या बोलत होत्‍या. या सभेला राष्‍ट्रीय शिवाजी सेनेचे श्री. श्रीनिवास चारी आणि समितीचे तेलंगाणा राज्‍य समन्‍वयक श्री. चेतन गाडी यांनीही संबोधित केले. राष्‍ट्रीय शिवाजी सेनेच्‍या धर्मकार्याचा परिचय श्री. वेणुगोपाल यांनी करून दिला.