नारीचा सन्‍मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१. रयतेतील स्‍त्रीवर अत्‍याचार करणार्‍या पाटलाला किशोर वयातील शिवरायांनी चौरंग्‍याची शिक्षा देणे

कु. मधुरा भोसले

‘रांजेगावच्‍या पाटलाने गावातील महिलेवर बलात्‍कार केला. किशोर अवस्‍थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्‍याची (व्‍यक्‍तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.

२. शत्रूच्‍या स्‍त्रीला मातेचा सन्‍मान देऊन तिला स्‍वगृही पाठवणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्‍याणचा खजिना लुटल्‍यावर लुटलेल्‍या धनसंपत्तीसोबत कल्‍याणच्‍या मुसलमान सुभेदाराच्‍या सुनेलाही राजसभेत नजराणा म्‍हणून आणण्‍यात आले. तेव्‍हा त्‍यांनी त्‍या शत्रूच्‍या युवतीला आईची उपमा देऊन तिला सन्‍मानाने घरी पाठवले.

३. प्रजा आणि धर्म यांच्‍या अस्‍मितेवर घाला घालणार्‍या नराधम अफझलखानाचा कोथळा काढून त्‍याला कठोर दंड देणे

राक्षसी अफझलखानाने हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडली. हिंदु देवतांच्‍या शेकडो मूर्ती फोडल्‍या आणि अनेक हिंदु स्‍त्रियांवर बलात्‍कार केला. पाशवी अत्‍याचार करणार्‍या नराधम अफझलखानाला कठोर दंड देण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी भेटीचे निमित्त साधून खानाचा कोथळा बाहेर काढला आणि मावळ्यांंनी खानाचे बलाढ्य सैन्‍य कापून काढले.

४. हिंदु स्‍त्रियांचे शील भ्रष्‍ट करणार्‍या शाहिस्‍तेखानाची बोटे छाटणे

स्‍वराज्‍यात जाळपोळ करून रयतेला लुटणार्‍या आणि हिंदु स्‍त्रियांचे शील भ्रष्‍ट करणार्‍या शाहिस्‍तेखानाची बोटे छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली.’

– कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०१९)