कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ! 

निपाणी येथे ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यान’ घेणारे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील कार्यकर्ते, प्रशिक्षणार्थी आणि उपस्थित विद्यार्थी

कोल्हापूर – क्रांतीकारकांच्या असीम त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांनी केलेल्या या त्यागाचे आणि शौर्याचे सर्वांना स्मरण व्हावे आणि सर्वांना राष्ट्र-धर्म यांचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे नियोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यान’ घेणारे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील कार्यकर्ते, प्रशिक्षणार्थी आणि उपस्थित विद्यार्थी

हे व्याख्यान पुलाची शिरोली, घुणकी, आवळी बुद्रुक, कडगाव, लाटवडे, इंगळी, मत्तिवडे, करनूर, दानोळी, लक्षतीर्थ, मलकापूर अशा विविध ठिकाणी घेण्यात आले. या प्रसंगी क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या विविध फ्लेक्सच्या माध्यमातून शौर्यशाली इतिहास सांगण्यात आला. याचा लाभ १ सहस्र ३५० जणांनी घेतला. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात येणार्‍या प्रशिक्षणार्थींच्या विशेष पुढाकाराने या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

निपाणी येथे ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यान’ घेणारे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील कार्यकर्ते, प्रशिक्षणार्थी आणि उपस्थित विद्यार्थी

क्षणचित्रे

१. व्याख्यानस्थळी क्रांतीकारकांच्या कार्याची माहिती देणारे ‘फ्लेक्स’ सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
२. व्याख्यानानंतर काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे हिंदु जनजागृती समिती अंतर्गत स्वरक्षणवर्ग चालू करण्याची मागणी जिज्ञासूंनी केली.
३. ‘विषयातून प्रेरणा मिळाली आणि छान वाटले’, अशी प्रतिक्रिया अनेक जणांनी दिली.

घुणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून विशेष उपक्रम पत्रक दिले.