गंगटोक – सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिमालय पर्वतांच्या कुशीत ‘गणेश टोक’ नावाचे पवित्र स्थान वसलेले आहे. येथे श्री गणेशाचे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरात अष्टविनायकांच्याही मूर्ती आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सिक्कीम राज्याच्या दौर्यावर असतांना सप्तर्षींच्या आज्ञेने २१.३.२०२२ या दिवशी त्यांनी ‘गणेश टोक’ या मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले.
‘गणेश टोक’ मंदिराविषयीची माहिती
वर्ष १९५२ मध्ये भारत सरकारचे एक उच्चपदस्य अधिकारी श्री. अप्पाजी पंत जे मूळचे महाराष्ट्रातील होते, त्यांची सिक्कीम राज्यात नियुक्ती झाली होती. श्री. अप्पाजी पंत हे धार्मिक प्रवृत्तीचे आणि देवाचे भक्त होते. वर्ष १९५३ मध्ये त्यांना एक स्वप्नदृष्टांत झाला होता. स्वप्नात त्यांना गुहेत असलेल्या श्री गणेशाचे दर्शन झाले. त्यांनी या स्थानाचा शोध घेतला असता त्यांना आताच्या ‘गणेश टोक’ या ठिकाणी असलेल्या गुहेमध्ये श्री गणेशाचे साक्षात् दर्शन झाले. त्या गुहेच्या ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकांना श्री गणेशाच्या पूजेची प्रथा घालून दिली. गुहेत जाण्यासाठी फारच अल्प जागा होती. वर्ष २००७ मध्ये भारतीय सैन्याने गुहेच्या ठिकाणी एका मंदिराची निर्मिती करून त्यामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. येथे ५० पायर्या चढून दर्शनासाठी जावे लागते. येथे पूजेसाठी नेपाळचे वैदिक ब्राह्मण असतात.
‘गणेश टोक’ या मंदिरात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘हे गजानना, हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे तू दूर कर आणि या पवित्र भरतभूमीचे तू रक्षण कर’, अशी भावपूर्ण प्रार्थना केली. – श्री. विनायक शानभाग |
वैशिष्ट्यपूर्णश्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या मंदिरामध्ये श्री गणेशाच्या दर्शनाला गेल्या असता तेथील पुजार्यांना कळले की, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प घेऊन आल्या आहेत. तेव्हा त्यांनी श्री गणेशाकडे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ दे’, अशी प्रार्थना केली. – श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), गंगटोक, सिक्कीम. (२५.३.२०२२) |