चीनने वर्ष २००७-०८ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करार रोखण्यासाठी भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते !

निवृत्त सनदी अधिकारी विजय गोखले यांचा पुस्तकाद्वारे आरोप !

  • भारतातील साम्यवादी पक्ष नेहमीच चीन आणि रशिया यांचे बटीक राहिल्याचा इतिहास आहे. अशा पक्षांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! गोखले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याची सत्यता समोर आणली पाहिजे !
  • विजय गोखले यांनी ही माहिती तेव्हाच का उघड केली नाही ? आता पुस्तक प्रसिद्ध करून पुस्तकाला प्रतिसाद मिळावा म्हणून त्यांनी हे उघड केले का ?

नवी देहली – भारत आणि अमेरिका यांच्यात वर्ष २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणू करार रोखण्यासाठी चीनने भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते. तसेच भारतातील या नेत्यांच्या माध्यमातून चीनने देशात विरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा भारताचे सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केला आहे. गोखले यांचे ‘द लाँग गेम : हाऊ द चायनिज निगोशिएट विथ इंडिया’ (प्रदीर्घ खेळी : चिनी भारताशी कशा प्रकारे वाटाघाटी करतात ?) हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून यात अनेक खुलासे करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात वर्ष २००७-०९ या काळात गोखले अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते.  भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करारात आण्विक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांती एकमेकांना सहकार्य करण्याची तरतूद होती. या करारामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध वाढीस लागले.

भारताचे सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले

गोखले यांनी या पुस्तकात म्हटले आहे की,

१. चीनचे भारतातील ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्सर्वादी)’ या दोन्ही साम्यवादी पक्षांशी घनिष्ठ संबंध होते. चीनने या साम्यवादी पक्षांच्या माध्यमातून या अणू कराराला विरोध करण्याचा प्रयत्न होता. भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये चीनकडून हस्तक्षेप करण्याचा हा बहुदा पहिलाच प्रयत्न असावा.

२. सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध यांसह अन्य सूत्रांवर दोन्ही साम्यवादी पक्षांची भूमिका राष्ट्रवादी होती; मात्र चीनला भारत आणि अमेरिका यांच्यात होणार्‍या अणू कराराची चिंता सतावत होती. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात होणार्‍या अणू करारात चीनकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला.

४. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये साम्यवाद्यांच्या किती प्रभाव आहे, याविषयी चीनला कल्पना होती आणि भारतीय अमेरिकेकडे झुकतील या भीतीपोटी चीनने ही खेळी केली. हे करतांना ‘स्वतः पडद्यामागे राहू’ अशी खबरदारी चीनने घेतली.

५. चीनने याव्यतिरिक्त साम्यवाद्यांच्या जवळच्या मानल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांचाही यासाठी वापर केला. या कराराविषयी माध्यमांमध्ये वैचारिक गोंधळ होता. (राष्ट्रघातकी प्रसारमाध्यमांचा शोध घेऊन त्यांना देशातील जनतेसमोर उघडे पाडले पाहिजे आणि अशांवर जनतेने बहिष्कार घातला पाहिजे ! – संपादक)

(म्हणे) ‘चीनमुळे आम्ही अणू करारला विरोध केलेला नाही !’ – माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी दावा फेटाळला

साम्यवादी पक्षांनी चीनला भारताविरोधात साहाय्य केले असेल, तरी ते कधीतरी मान्य करतील का ?

माकपचे सरचिटणीस प्रकाश करात

विजय गोखले यांचा दावा माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी फेटाळून लावला. करात म्हणाले की, अणू कराराला विरोध करण्याविषयी चीनशी आमची कोणतीही चर्चा झाली नाही. या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ होणार होते; म्हणून आम्ही अणू कराराला विरोध केला. (भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारले, तर साम्यवादी पक्षाला त्यामुळे पोटशूळ का उठतो ? भारत चीनला सोडून अमेरिकेच्या जवळ जात असल्याने आणि अमेरिका अन् चीन हे शत्रू असल्यामुळे साम्यवादी पक्षांनी याला विरोध केला, हे लक्षात घ्या ! – संपादक) या करारामुळे भारताला काहीच लाभ झाला नाही.