समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले

सद्य:स्थितीत अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी धर्मसंस्थापना आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातून हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आवश्यकता सांगून त्यासाठी अहर्निश कार्यरत असणारी विभूती म्हणजे, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी सकल संतांचे पाठबळ आवश्यक आहे, हे जाणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९६ पासूनच या कार्यासाठी संतांना संघटित करण्यास आरंभ केला होता. परात्पर गुरु डॉक्टरांमधील संतांप्रतीचा भाव, शिकण्याची वृत्ती, नम्रता, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे अनेक संतांशी जवळीक झाली आणि ते संत सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले गेले. पुढे परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणारे सनातनचे अनेक संत अन् साधक घडले. ‘आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळवेळ तया लागी ।।’, असा गुरुमहिमा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत अन् साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली योग्य साधना केल्यामुळे साधकांमध्ये निर्माण झालेले साधकत्व पाहून समाजातील संत प्रभावित होतात. जगद्व्यापी हिंदूसंघटन आणि धर्मप्रसार, तसेच विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्र-स्थापना, या सनातन संस्थेच्या उदात्त ध्येयांमुळे समाजातील संतांना संस्थेचे कार्य प्रशंसनीय वाटते. अशा सार्‍या संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत याविषयीचे काही पैलू आपण १८ जुलै या दिवशी पाहिले होते. आज आपण अन्य पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळे सनातनच्या साधकांची साधनेत झालेली प्रगती पाहून समाजातील संत प्रभावित होणे

१ अ. सनातनचे श्री. राम होनप यांनी एका संतांच्या आदेशानुसार काही घटनांचे सूक्ष्म परीक्षण अचूक केल्यावर त्यांची सूक्ष्म-ज्ञान मिळवण्याची क्षमता पाहून ते संत प्रभावित होणे : ‘सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप एका संतांच्या भेटीसाठी गेले असता संतांनी त्यांना काही घटनांचे सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगितले. नंतर संतांनी त्या सूक्ष्म परीक्षणाविषयी भ्रमणभाषवरून आपल्या गुरूंना सांगितले. त्या वेळी गुरूंनी ‘ते सूक्ष्म परीक्षण योग्य आहे’, असे सांगितले. तेव्हा श्री. राम होनप यांच्या सूक्ष्म-ज्ञान मिळवण्याच्या क्षमतेवर ते संत प्रसन्न झाले. ते म्हणाले, ‘‘अशा साधकांना सिद्ध करणारी सनातन संस्था आणि ती करत असलेले मार्गदर्शन अनमोल आहे.’’ अशा प्रकारे ते संत सनातनशी जोडले गेले.’ – श्री. निषाद देशमुख (सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ आ. कर्नाटकातील एका संतांकडे गेलेल्या सनातनच्या साधकांना संतांनी न भेटताही ‘त्यांची नामसाधना चालू आहे’, हे संतांनी ओळखणे आणि साधकांना जवळ बोलवून त्यांच्याशी संवाद साधणे : ‘मी २ साधकांसह कर्नाटकातील एका संतांच्या भेटीसाठी गेलो होतो. तेथील सभागृहात संतांना भेटायला आलेल्या लोकांची पुष्कळ गर्दी होती. त्यामुळे आम्ही तेथेच बाजूला बसलो. तिथे आलेले लोक संतांना मायेतील प्रश्न विचारत होते. साधारण एका घंट्यानंतर ते संत म्हणाले, ‘‘तुम्ही सगळे जण मायेतील विचारांत गर्क आहात; पण बाजूला बसलेले हे तिघेही जण (साधक) श्रीकृष्णाच्या नामात दंग आहेत.’’ ‘आम्हा साधकांची नामसाधना चालू आहे’, हे त्या संतांनी ओळखले आणि गर्दीतून आम्हाला त्यांच्याजवळ बोलवून आमच्याशी संवाद साधला.

१ आ १. संतांनी सनातनचे श्री. राम होनप यांना ‘तुमचे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) वैकुंठातून आले आहेत’, असे सांगून ‘सनातनचे आणि दत्तगुरूंचे कार्य एकच आहे’, असे सांगणे : संत आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही गोव्यातून आला आहात. तुमचे गुरु वैकुंठातून आले आहेत आणि ते जिथे रहात आहेत, तो आश्रमही वैकुंठच आहे. भारतात ठराविक संत समाजाच्या उद्धाराचे कार्य करत आहेत. तुमचे गुरु त्यांपैकीच एक आहेत. सनातनचे कार्य माझेच, म्हणजेच दत्तगुरूंचे कार्य आहे.’’

नंतर त्या संतांनी आपुलकीने माझ्याशी संवाद साधला. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि सनातन संस्थेवरील संकटांचे निवारण व्हावे’, यांसाठी त्यांनी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘महारुद्र याग’ करण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार नोव्हेंबर २०१९ मध्ये रामनाथी आश्रमात हा याग करण्यात आला.’

– श्री. राम होनप (सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. सनातन संस्थेच्या कार्यामुळे समाजातील संत सनातनशी जोडले जाणे

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्थेचे कार्य, हीच साधकांची खरी ओळख !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्थेचे कार्य, यांमुळेच समाजातील संत सनातनच्या साधकांचा स्वीकार करतात. आम्ही भारतभर भ्रमण करतांना अनेक लोकांना आणि संतांना भेटतो. तेव्हा पावलोपावली आम्हाला याची प्रचीती येते.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२ आ. वाराणसी येथील लिंगायत मठाचे शंकराचार्य जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य यांनी सनातन संस्थेचे कार्य पाहून सकारात्मक विश्वास व्यक्त करणे आणि संस्थेला आशीर्वाद देणे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘साधारण वर्ष २००० मधील हा प्रसंग आहे. वाराणसी येथील लिंगायत मठाचे शंकराचार्य जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य मिरज येथील सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) शरदिनी कोरे यांच्या घरी आले होते. त्यांना सनातन संस्थेचे कार्य सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हे कार्य पाहून मला विश्वास वाटतो, ‘तुम्ही चांगलेच कार्य करत आहात. तुमच्या गुरुदेवांचे मार्गदर्शन घेऊन साधना आणि कार्य करत रहा.’’ त्यानंतर वेळोवेळी ते संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि समर्थन देत होते.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

२ इ. सनातन संस्था-निर्मित ग्रंथांतील चैतन्यामुळे संत सनातन संस्थेशी जोडले जाणे

नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देण्यासाठी महंत ग्यानदास महाराज आल्यानंतर त्यांचा सन्मान करतांना (डावीकडे) सद्गुरु नंदकुमार जाधव (वर्ष २०१५)

२ इ १. श्री महामंडलेश्वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज, जम्मू : सनातनच्या साधकांनी महाराजांची भेट घेतली आणि त्यांना सनातनचे ग्रंथ दाखवले. तेव्हा महाराज साधकांना म्हणाले, ‘‘मला सनातनचे ग्रंथ पाहून पुष्कळ चांगले वाटले. माझे तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. जम्मू येथे आमचे ३ आश्रम आहेत. तुम्ही आश्रमाला भेट द्यावी. तेथे तुमच्या रहाण्याची पूर्ण व्यवस्था केली जाईल.’’ (दैनिक ‘सनातन प्रभात’, १९.१.२०१९)

२ ई. ‘सनातन प्रभात’मधील धर्मजागृतीपर निर्भीड लिखाण आणि चैतन्य यांमुळे संत प्रभावित होणे

सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार नियतकालिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसारित केले जातात. हे विचार समाजातील संत, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांना अत्यंत भावतात. त्यांना ‘सनातन प्रभात’ हे सनातन संस्थेचे मुखपत्रच असल्यासारखे वाटते.

२ ई १. पू. चंद्रप्रकाश खेतानजी, झुंझुनू, राजस्थान

२ ई १ अ. पू. चंद्रप्रकाश खेतानजी यांनी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे कौतुक करून साधकांची निवासव्यवस्था स्वतःच्या आश्रमात करण्याची सिद्धता दर्शवणे : ‘झुंझुनू, राजस्थान येथील ‘श्री अरविंद आश्रमा’चे पू. चंद्रप्रकाश खेतानजी यांना पहिल्यांदा भेटल्यावर त्यांना पाक्षिक ‘सनातन प्रभात’ दिले. पाक्षिक पाहिल्यावर ते म्हणाले, ‘‘आज हिंदु धर्माविषयी अशा शब्दांत लिहिणारे एकही पाक्षिक नाही. मला वाटायचे, ‘हिंदु धर्माविषयी समजू शकणारे कुणीच नाही का ?’; पण तुमचा हा प्रयत्न पाहून मला आनंद झाला. हे पाक्षिक धर्मप्रबोधनासाठी महत्त्वाचे आहेच आणि यातून सूक्ष्म स्तरावर जी स्पंदने येत आहेत, त्यांनाही पुष्कळ महत्त्व आहे. तुम्ही योगी अरविंद यांचेच कार्य करत आहात. येथून पुढे तुम्ही जेव्हा झुंझुनूमध्ये याल, तेव्हा आमच्या आश्रमातच रहायला या. तुम्ही आश्रमाचे नियम पाळले नाहीत, तरी चालेल. तुम्हाला आमच्याकडून काही असुविधा होत असेल, तर आम्हाला सांगा.’’ त्या वेळी त्यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’साठीही लगेचच अर्पण देऊ केले.

२ ई १ आ. पू. चंद्रप्रकाश खेतानजी यांनी सनातनला केलेले अन्य साहाय्य

१. पू. खेतानजी यांनी साधकांसाठी आयुर्वेदीय औषधे दिली.

२. देहली येथे होणार्‍या ‘उत्तर भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सेवेसाठी येणार्‍या साधकांच्या निवासाची व्यवस्था त्यांनी देहली येथील ‘श्री अरविंद आश्रमा’त केली.

३. ते हरिद्वार येथे प्रचारासाठी जाणार्‍या साधकांचा निवास आणि भोजन यांची व्यवस्था त्यांच्या हरिद्वार येथील आश्रमात करतात.

४. वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी साहाय्य केले.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

२ उ. सनातन संस्थेचे ‘ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन’ पाहून सनातनला साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवणारे संत

२ उ १. महंत विनोदगिरीजी महाराज, हरिद्वार : ‘सनातन संस्थेने लावलेले प्रदर्शन पाहून महंत विनोदगिरीजी महाराज प्रभावित झाले. ते सनातनच्या साधकांना म्हणाले, ‘‘आम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी तन-मन-धन अर्पण करण्यास कधीही सिद्ध आहोत. तुम्ही हरिद्वारला या. तेथे आम्ही सनातनचे केंद्र उघडू इच्छितो.’’ (दैनिक ‘सनातन प्रभात’ रत्नागिरी आवृत्ती (१२.३.२०१३))

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

२ उ २. महंत ग्यानदास महाराज, नाशिक : ‘सनातन संस्थेने नाशिक येथे लावलेले प्रदर्शन पाहण्यास महंत ग्यानदास महाराज आले होते. ते सनातनच्या साधकांना म्हणाले, ‘‘तुमच्या गुरूंना मी पाहिले नाही; पण त्यांना माझा नमस्कार सांगा. खरेतर आज तुम्ही जे कार्य करत आहात, ते कार्य शंकराचार्यांनी करायला हवे. तुमच्याकडे पैसे नसतांनाही तुम्ही सर्वजण झोकून देऊन कार्य करत आहात. माझा या कार्याला आशीर्वाद आहे. तुम्हाला कधीही कोणतेही साहाय्य लागले, तरी मला सांगा.’’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये, नाशिक (११.९.२०१५)

२ ऊ. सनातनचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य पूर्णत्वास नेण्याविषयी आश्वस्त करणारे संत

२ ऊ १. आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती, महामंडलेश्वर, मथुरा-वृंदावन, उत्तरप्रदेश : ‘सनातन संस्थेत कार्य करणारे तरुण संकल्पबद्ध असून ते ‘हिंदु समाज’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ यांची शक्ती आहेत. हिंदु राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल आहे. लवकरच आपण हिंदु राष्ट्राचा संकल्प साकार करू.’ (दैनिक ‘सनातन प्रभात’, १६.२.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.