|
|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील सत्ताधारी माकपने त्यांचे ख्रिस्ती कार्यकर्ते पी.टी. गिल्बर्ट यांना पक्षातून काढले आहे. त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा विरोध केल्याने पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी धर्मांतराच्या विरोधात तक्रार केली होती.
Kerala CPM expels Christian member who questioned the alleged forced conversion of his wife and son to Islam https://t.co/s9CB2JTt8M
— OpIndia.com (@OpIndia_com) June 23, 2021
१. गिल्बर्ट यांनी आरोप केला की, या धर्मांतरामागे पंचायत सदस्य नजीरा आणि कालीकत विश्वविद्यालयातील कर्मचारी असलेला तिचा पती युनूस हा आहे. त्यांनीच माझी पत्नी आणि मुलगा यांचे धर्मांतर घडवून आणले. यात कोट्टियादीन इस्माईल याचाही हात आहे. तो येथेच बेकरीचे दुकान चालवतो. तसेच लतीफ उपाख्य कुंजन, शाहुल हमीद, बुशरा आणि कुलसू हे माझे शेजारीही यात सहभागी आहेत. माझी पत्नी इस्माईलच्या दुकानात काम करत होती.
२. गिल्बर्ट यांनी सांगितले की, मी माझ्या पक्षाकडे माझी पत्नी आणि मुलगा यांचे बलपूर्वक धर्मांतर रोखण्यासाठी साहाय्य मागितले होते; मात्र त्यानंतर लगेच पक्षाच्या मल्लपूरम् जिल्हा समितीने प्रसिद्धीपत्रक काढून मला पक्षातून काढल्याची माहिती दिली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला.