मुसलमानेतर देशच आजपर्यंत मुसलमानांसाठी अधिक सुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशातील इस्लामी शक्तींनी भारतातील मुसलमानांच्या ऐक्यासाठी बांगलादेशात हिंसा भडकावली. त्या मूर्ख बांगलादेशी इस्लामी शक्तींना हे ठाऊक नाही की, भारतीय मुसलमान भारत सोडून बांगलादेश अथवा पाकिस्तान या इस्लामी राष्ट्रांत कधीही जाणार नाहीत.

मुसलमानेतर देशच आजपर्यंत मुसलमानांसाठी अधिक सुरक्षित आहेत, असे ट्वीट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्‍याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे झाली. त्या पार्श्‍वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे ट्वीट केले आहे.