सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्रांसह दोघा बांगलादेशी घुसखोरांना अटक

सर्वसामान्य व्यक्तीलाही अशी कार्ड बनवण्यास अनेक समस्यांना सामारे जावे लागत असतांना घुसखोरांना ते सहज मिळतात, हे लज्जास्पद ! त्यांना हे कार्ड बनवून देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचाच गुन्हा नोंदवला पाहिजे !

बांगलादेशी घुसखोर तनवीर आणि महंमद उस्मानी – पिता पुत्र

सहारणपूर (उत्तरप्रदेश) – राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने येथून दोघा बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. हे दोघे पिता आणि पुत्र आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्रेही सापडली आहेत. तसेच बांगलादेशचे ओळखपत्र सापडले आहे. तनवीर आणि महंमद उस्मानी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.