बिहारमध्ये हिंदु देवतांचा अवमान करणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी एका महिलेला अटक

अशा गुन्ह्यांच्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा मिळत नसल्याने असे गुन्हा थांबत नाहीत. सरकारने दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यामुळे इतरांवर वचक बसेल !

वैशाली (बिहार) – सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध असणार्‍या किरण यादव या महिलेला येथील पोलिसांनी हिंदु देवतांचा अवमान करणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. (मुसलमान किंवा ख्रिस्ती कधीही स्वतःच्या धर्माचा अवमान करत नाही; मात्र स्वतःला पुरो(अधो)गामी आणि निधर्मी समजणारे आणि ते जगाला दाखवण्यासाठी जन्महिंदू स्वतःच्या देवतांचा अवमान करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

(सौजन्य : Bihar Tak)

पोलिसांनी सांगितले की, २ डिसेंबरला एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यात हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता. या व्हिडिओवरून किरण यादव यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.