
सांगली, १६ डिसेंबर (वार्ता.) – भाजपा महिला मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्षा (सौ.) स्वाती शिंदे यांनी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात महिला आघाडीच्या पदाधिकार्यांसाठी सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या वेळी सोशल मीडियाचा वापर प्रभावी पद्धतीने कसा करावा ?, आपले काम समाजापर्यंत कसे पोचवावे ? समाजामध्ये घडणार्या गोष्टींचे ज्ञान आपण कसे करून घ्यायचे ?, पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत कशी पोचवावीत ?, याचे प्रशिक्षण दिशा दुगानी यांनी अत्यंत सोप्या शब्दांत दिले. या वेळी भाजप प्रसिद्धीप्रमुख श्री. केदार खाडिलकर आणि श्री. संकेत कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी नगरसेविका सविता मदने, गीतांजली ढोपे-पाटील, उर्मिला बेलवलकर, अप्सरा वायदंडे, लक्ष्मी सरगर यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री