‘कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे फेसबूकची मवाळ भूमिका !’ – अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा थयथयाट !

  • ‘बजरंग दल’ला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास फेसबूकचा नकार !

  • कुठलाही भेदभाव करत नसल्याचे फेसबूकचे स्पष्टीकरण

  • हिंदूंच्या संघटनांना ‘हिंसक’ ठरवण्याच्या केलेल्या या प्रयत्नांवरून भारत सरकारने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’वर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! भारतात अशा दैनिकांच्या विक्रीवर आणि संकेस्थळावर बंदी घातली पाहिजे !
  • ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला फेसबूकवर असलेल्या जिहादी आतंकवाद्यांची खाती दिसत नाहीत का ? जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याचे खाते चालू असल्याविषयी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ फेसबूकला ते बंद करण्याविषयी सल्ला का देत नाही ?
  • ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सारख्या अमेरिकी वृत्तपत्रांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा ! अमेरिकेतील वर्णद्वेष, तेथील भेदभाव यांविषयी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ काही बोलत का नाही ?

नवी देहली – सामाजिक माध्यम म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेसबूकने ‘बजरंग दल’ या संघटनेला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला आहे. याविषयी अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाच्या वृत्तामध्ये मात्र ‘भारतातील सत्ताधारी हिंदु राष्ट्रवादी नेते  आणि बजरंग दल यांवर कारवाई केल्यास फेसबूकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. तसेच त्याच्या कर्मचार्‍यांवर आक्रमण होऊ शकतात त्यामुळे फेसबूकने बजरंग दलाविषयी मवाळ भूमिका घेतली, असा दावा करण्यात आला आहे.

१. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तामध्ये बजरंग दलाचा एक व्हिडिओ आणि त्याच्यावर फेसबूकने केलेल्या कारवाईचा दाखला दिला आहे. यामध्ये बजरंग दलाने जून मासात नवी देहली येथे  एका चर्चवर झालेल्या आक्रमणाचे दायित्व घेतल्याचा दावा करण्यात आला होता.

२. या वृत्तावर प्रतिक्रिया देतांना फेसबूकने आरोप फेटाळले आहेत. फेसबूकने म्हटले आहे की, धोकादायक संघटना किंवा व्यक्ती ठरवण्यसाठी आम्ही त्यांची राजकीय ओळख काय आहे किंवा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे असा भेदभाव करत नाही.

हिंदुद्वेषी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही थयथयाट !

राहुल गांधी यांनीही ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तावरून ट्वीट केले आहे. त्यांनी आरोप करतांना म्हटले, ‘भाजप आणि रा.स्व. संघ यांचे भारतातील फेसबूकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.’

त्यांनी याविषयीचा एन्.डी.टी.व्ही.चा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. (‘उंदराला मांजर साक्षी’ याप्रमाणेच राहुल गांधी यांनी हिंदुद्वेषी वृत्तवाहिनी एन्.डी.टी.व्ही.चा व्हिडिओ पोस्ट केला आहे, असे म्हणावे लागेल ! – संपादक)