‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावर दक्षिण आशियाई वैद्यकीय विद्यार्थी संस्थेच्या (‘साम्सा’च्या) वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका डॉ. श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावर ‘दक्षिण आशियाई वैद्यकीय विद्यार्थी संघटने (साम्सा)’ने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’साठी विविध सेवा करतांना आधुनिक वैद्य श्रिया साहा यांना शिकायला मिळालेली सूत्रे, ‘वेबिनार’च्या आयोजनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा यांविषयी दोन भाग प्रसिद्ध करण्यात आले. आज या लेखाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहोत.
भाग ३
भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/424154.html
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426585.html
१२. अनुभूती
१२ अ. ‘साम्सा’च्या प्रत्येक ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात एक वैद्यकीय विद्यार्थी अनुचित शेरेबाजी करत असणे, या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या गटालाही सतत संपर्क करून किंवा लघुसंदेश पाठवून तो त्रस्त करत असणे, त्यामुळे ‘तो या कार्यक्रमातही व्यत्यय आणणार’, असे वाटणे; परंतु त्याने संपूर्ण कार्यक्रम शांतपणे ऐकणे : ‘साम्सा’च्या प्रत्येक ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात एक वैद्यकीय विद्यार्थी काही ना काही अनुचित शेरेबाजी करत होता. आमच्या आयोजकांच्या गटातील सदस्यांनाही सतत संदेश पाठवून किंवा संपर्क करून तो त्रस्त करत होता. त्यामुळे काही लोकांनी त्याचा संपर्क क्रमांक बंद (‘ब्लॉक’) केला होता. ‘वेबिनार’ चालू झाला, तेव्हा त्याने ‘झूम चॅट’वर काही लिहून पाठवले. त्या वेळी ‘आता तो या संपूर्ण सत्रात त्रास देईल’, असे आम्हाला वाटले; परंतु डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी विषयाला आरंभ केल्यानंतर त्याने एकही अयोग्य शेरा पाठवला नाही. संपूर्ण सत्रामध्ये तो अगदी शांत होता. प्रश्नोत्तरांच्या सत्रात त्याने एक चांगला प्रश्न विचारला. ‘त्याच्यामध्ये असा पालट पहाणे’, हीच माझ्या पूर्ण गटासाठी एक अनुभूती होती.
१३. सेवेत झालेल्या चुका आणि त्याविषयी मनात आलेल्या प्रतिक्रिया
१३ अ. ‘वेबिनार’च्या प्रचारासाठी साधकांनी एक ‘पोस्ट’ पाठवली असणे; मात्र त्यावर काहीच प्रतिसाद न मिळणे, काही दिवसांनी त्या ‘पोस्ट’मध्ये ‘वेबिनार’च्या चित्राखाली दुसरेच लिखाण लिहिले असल्याचे लक्षात येणे आणि तेव्हा मनात प्रतिक्रिया येऊन मन अस्वस्थ होणे : या ‘वेबिनार’च्या प्रसाराविषयी माझे प्रथम एका साधकाशी बोलणे झाले होते. त्याप्रमाणे त्यांनी एक ‘पोस्ट’ करून पुढे पाठवली होती; परंतु तरीही प्रसार चालू होण्यात विलंब होत होता. पुढे काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे माझ्या मनात प्रतिक्रिया येत होत्या. काही दिवसांनी साधकांना ‘व्हॉट्सअॅप पोस्ट’ आली. तेव्हा ‘या कार्यक्रमाच्या प्रसारचित्राखाली दुसरेच लिखाण पाठवले गेले आहे आणि याच्या प्रसारासाठी जी वेगळी ‘लिंक’ बनवली होती, ती त्याला जोडली गेली नाही’, असे लक्षात आले. ही गोष्ट ‘सोशल मिडिया’ची सेवा पहाणार्या साधकाशी बोलल्यानंतर ‘ती ‘पोस्ट’ अन्य एका साधकाने प्रसारासाठी पुढे पाठवली आहे’, असे समजले. तेव्हा ‘प्रसारातील साधकांशी समन्वय करून ‘पोस्ट’ पुढे पाठवायला पाहिजे होती’, असे अपेक्षेचे विचार माझ्या मनात येऊन मन अस्वस्थ झाले.
१३ आ. कार्यक्रमाच्या सरावाच्या वेळी तांत्रिकदृष्ट्या जोडणी होऊ शकत नसतांना मनात प्रतिमेचे विचार येणे : सराव चालू करण्यापूर्वी मी माझ्या सहकार्यांना सांगितले, ‘‘एम्एव्ही’चे साधक फार वक्तशीर आहेत; म्हणून आपण आपली जोडणी वेळेवर करूया.’’ त्यानुसार आम्ही सर्व जण वेळेवर जोडले गेलो; मात्र तांत्रिक अडचणींमुळे गोवा येथील आश्रमातून जोडणी होत नव्हती. त्यांच्याकडून होणार्या विलंबामुळे ‘माझे सहकारी काय म्हणत असतील आणि त्यांचा वेळही वाया जात आहे’, असे प्रतिमेचे विचार माझ्या मनात आले.
१३ इ. सरावाविषयी आलेल्या प्रतिक्रिया : आम्हाला शेवटच्या सरावाची वेळ मुख्य कार्यक्रमाच्या केवळ एक घंटा आधी सांगितली, तसेच आम्ही जोडणी केल्यावर तांत्रिक गटाच्या साधकाने ‘अर्ध्या घंट्यानंतर सराव घ्यायचा आहे’, असे सांगितले. तेव्हा ‘केवळ अर्धा घंटा आधी सराव घेतांना गडबड होईल’, असे मला वाटले. ‘या गोष्टी आम्हाला वेळेत सांगायला हव्या होत्या’, असे विचार माझ्या मनात आले. ‘सेवेचा समन्वय अतिशय चांगला व्हायला हवा’, हे मला अनेक प्रसंगांत जाणवले.
१३ ई. एका अन्य धर्मीय व्यक्तीने कार्यक्रमासाठी नोंदणी केल्यावर ‘त्यावर आपण कृती करायला हवी’, असे एका साधकाने सांगितल्यावर ‘वेबिनार’चा विषय स्पष्ट असून तो सर्वांसाठी खुला आहे, त्यामुळे साधकाने अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही’, अशी प्रतिक्रिया मनात येणे आणि ‘यावर सहकारी काय विचार करतील ?’, असे वाटणे : एका साधकाने माझ्या एका सहकार्याला ‘अन्य धर्माच्या एका व्यक्तीने नोंदणी केली असून तो ‘व्हॉट्सअॅप’ गटामध्ये आहे. त्यावर ‘आपल्याला आवश्यक कृती करायला पाहिजे’, असे सांगितले. त्यावर माझ्या मनात प्रतिक्रिया आली, ‘हे ‘वेबिनार’ एक वैद्यकीय विद्यार्थी आणि वैद्य यांची संघटना आयोजित करत आहे. त्याचा विषय स्पष्ट आहे आणि तो सर्वांसाठी लागू आहे. ‘हा कार्यक्रम एका विशिष्ट धर्मासाठी आहे’, असे त्यात कुठेही सांगितले नाही. त्यामुळे साधकाकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नाही.’ या प्रसंगात ‘माझे सहकारी काय विचार करतील ? संपूर्ण कार्यक्रम कुठल्याही धार्मिक वादात अडकायला नको’, असे काळजीचे विचार आले.
१३ उ. सहकारी साधकांकडे काही सेवा सोपवण्याचे नियोजन न केल्यामुळे उपायांसाठी वेळ न मिळणे आणि त्यामुळे कार्यक्रमात पुष्कळ अडचणी येणे : माझ्याकडून या सेवेचे नियोजन परिपूर्ण रूपाने झाले नाही. काही सेवांचे दायित्व मी दुसर्या गटातील सदस्यांना देऊ शकत होते; परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटले, ‘ते ही सेवा नीट करणार नाहीत. आपणच करावी.’ त्यामुळे उपायांना जेवढा वेळ देणे अपेक्षित होते, तो देता न आल्यामुळे ‘वेबिनार’मध्ये अनिष्ट शक्तींच्या अडचणी आल्या.
१४. शिकायला मिळालेले सूत्र
१४ अ. ‘पर्यायी सिद्धतेविषयी विचार करून तशी सिद्धता ठेवायला हवी’, हे शिकायला मिळणे : शेवटच्या क्षणी पर्यायी वक्त्याची चाचणी करत होते. तेव्हा मला वाटले, ‘आता काही मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू करायचा आहे आणि डॉ. (सौ.) नंदिनीताईंना कसलीही अडचण नाही, तर आता पर्यायी वक्त्याची चाचणी कशाला करत आहेत ?’ जेव्हा कार्यक्रम चालू झाला आणि माझ्या ‘ऑडिओ’मध्ये अडचण येत होती, तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मलाही पर्यायी आयोजकाची, तसेच पर्यायी जोडणी आणि पर्यायी उपकरणे यांचीही चाचणी करून ती सिद्ध ठेवायला पाहिजे होती.’
१५. कृतज्ञता
माझ्या माध्यमातून ही सेवा करवून घेतल्याविषयी मी परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. पूजनीय संतांचा संकल्प आणि आशीर्वाद यांसाठी कृृतज्ञता ! ‘ज्या साधकांनी आपला मौल्यवान वेळ या सेवेसाठी समर्पित केला’, त्या सर्व साधकांप्रती कृतज्ञता !’
(समाप्त)
– डॉ. श्रिया साहा, कोलकाता (नोव्हेंबर २०२०)
|