‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावर दक्षिण आशियाई वैद्याकीय विद्यार्थी संस्थेच्या (‘साम्सा’च्या) वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

भाग १

१. ‘साम्सा’ या संस्थेच्या व्यासपिठाचा आणि तेथे स्वतःकडे असलेल्या पदाचा उपयोग सेवेसाठी केला पाहिजे’, असे विचार मनात येणे; मात्र ‘त्याचे आयोजन करणे’, मला जमेल का ?’ आणि ‘सहकारी साथ देतील का ?’, या विचारांमुळे त्याविषयी संतांशी बोलण्यासाठी मनाचा संघर्ष होणे

‘बर्‍याच मासांपासून माझ्या मनात ‘दक्षिण आशियाई वैद्याकीय विद्यार्थी संस्थे’च्या (‘साम्सा’च्या) व्यासपिठाचा आणि तेथे असलेल्या माझ्या पदाचा उपयोग सेवेसाठी केला पाहिजे’, असे विचार येत होते. फेब्रुवारीमध्ये पू. नीलेश सिंगबाळ कोलकाता येथे आले होते. तेव्हा त्यांच्याशी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया (एम्एव्ही’)’च्या कार्यशाळेचे आयोजन करण्याविषयी बोलावे कि नाही ?’, असा संघर्ष माझ्या मनात चालू होता. ‘मी हे दायित्व घेऊन करू शकेन कि नाही ?’ आणि ‘साम्सा’ चे माझे सहकारी माझ्या कल्पनेला संमती देतील कि नाही ?’, या विचारांमुळे मला त्यांच्याशी याविषयी बोलायला संकोच वाटत होता.

डॉ. श्रिया साहा

२. पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘कार्यशाळा घेऊ शकतो’, असे सांगणे; मात्र आयोजक समितीच्या सदस्यांना हा विषय न रुचणे, पुढे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दळणवळण बंदी चालू होणे आणि त्यामुळे ‘साम्सा’ची राष्ट्रीय परिषद रहित केली जाणे

मी पू. नीलेश सिंगबाळ यांंना याविषयी सांगितले. तेव्हा ते उत्साहाने मला म्हणाले, ‘‘आपण तसे नियोजन करू शकतो.’’ त्यांनी मला ‘याविषयी कु. मिल्की अग्रवाल या साधिकेशी बोलायला पाहिजे’, असे सांगितले. त्या वेळी ‘साम्सा’ची राष्ट्रीय परिषद एप्रिलमध्ये होणार होती. तेव्हा ‘आपण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वक्त्यांना कार्यशाळेसाठी किंवा मनःशांतीसाठी महत्त्वाची संकल्पना मांडण्यासाठी (Keynote speech) आमंत्रण देऊ शकतो’, असे मी सुचवले; मात्र परिषदेच्या आयोजक समितीचे सदस्य या विचाराच्या बाजूने सकारात्मक नव्हते. त्यामुळे मी ही कल्पना रहित केली आणि नंतर दळणवळण बंदी चालू झाल्यामुळे ‘साम्सा’ची राष्ट्रीय परिषदच रहित करण्यात आली.

३. ऑक्टोबरमध्ये ‘साम्सा’ची ‘ऑनलाईन’ परिषद होणे, तेव्हाही ‘एम्एव्ही’चे एक सत्र समाविष्ट करण्यासाठी विचारणे; पण तेवढा वेळ नसल्यामुळे स्वतंत्र कार्यक्रम करण्याचे ठरवणे

ऑक्टोबरमध्ये ‘साम्सा’ची राष्ट्रीय परिषद ‘ऑनलाइन’ आयोजित करण्यात आली होती. तेव्हाही मी पुन्हा ‘एम्एव्ही’चे सत्र समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु आयोजक म्हणाले, ‘‘परिषदेच्या कालावधीत २ घंट्यांच्या सत्राचे नियोजन करू शकत नाही.’’ मी ते स्वीकारले आणि यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रमच आयोजित करण्याचा विचार केला.

४. ‘साम्सा’च्या वतीने सदस्यांच्या व्यतिरिक्त स्वतंत्र खुला कार्यक्रम ठेवला, तर संस्थेचे सदस्य त्याला विरोध करत असणे; पण हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवतांना एकाही सदस्याने विरोध न करणे

सर्वसाधारणपणे आम्ही आपल्या सदस्यांसाठीच कार्यक्रम आयोजित करतो आणि सदस्य नसलेल्यांसाठी शुल्क आकारतो. समितीतील कुणी सदस्य कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यासाठी सांगतो, तेव्हा समितीचे सदस्य त्याला विरोध करतात; कारण ‘त्यामुळे आपली सदस्यसंख्या वाढणार नाही’, असे त्यांना वाटते; परंतु ‘हा वेबिनार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि सर्वांना याचा लाभ व्हावा’, अशी माझी इच्छा होती. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या गटाच्या कुठल्याही सदस्याने त्याला विरोध केला नाही.

५. गुरुदेवांची अनुभवलेली कृपा

अ. ‘कार्यक्रमाचे पत्रक (Event image post (flyer) कलेच्या संदर्भात सेवा करणार्‍या साधकांद्वारे अनुमोदित झाले आणि त्यांनी ते आपल्या संग्रही ठेवले’, हे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

आ. ही सेवा परात्पर गुरु डॉक्टरांपर्यंत पोचली आणि ‘परात्पर गुरुदेव प्रसन्न झाले’, हे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– आधुनिक वैद्या श्रिया साहा, कोलकाता (नोव्हेंबर २०२०)


भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426585.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक