‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावर दक्षिण आशियाई वैद्यकीय विद्यार्थी संस्थेच्या (‘साम्सा’च्या) वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका डॉ. श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

भाग २

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/424154.html


६. हा ‘वेबिनार’ मानसोपचार तज्ञ आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी घ्यावा’, असे वाटणे; पण ‘त्या उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने निराश होणे, नंतर ‘त्याच ‘वेबिनार’ घेतील’, असे कळल्यावर कृतज्ञता वाटणे

‘या ‘वेबिनार’साठी वक्त्यांच्या रूपात आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत आणि श्री. शॉन क्लार्क यांचा विचार होता; परंतु उत्तरदायी साधक म्हणाले, ‘‘त्यांच्या व्यस्ततेमुळे कदाचित् ते घेऊ शकणार नाहीत.’’ तेव्हा मी क्षणभर निराश झाले. मी परात्पर गुरुदेवांना पूर्ण शरण जाऊन ‘ही सेवा कशी करायची ?’, हे तुम्हीच पहा’, अशी प्रार्थना केली. नंतर एका साधिकेने मला ‘आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत या वक्त्या असतील’, असे सूचित केले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत
डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

७. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी सूत्रसंचालन करण्यास सांगितल्यावर आत्मविश्‍वास न वाटणे आणि ही सेवा गुरुदेवांची इच्छा म्हणून स्वीकारणे

​‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी मी ‘एका मानसोपचार तज्ञ सहकार्‍याला सांगावे’, असा विचार करत होते आणि स्वतः केवळ आयोजन आणि समन्वय यांची सूत्रे पहायचे ठरवले. नंदिनीताईंनी ‘तुम्हीच सूत्रसंचालन केले पाहिजे’, असे सुचवले. त्याविषयी मला आत्मविश्‍वास वाटत नव्हता; परंतु मी ही सेवा ‘गुरुदेवांची इच्छा’, असे समजून स्वीकारली.

डॉ. श्रिया साहा

८. या कार्यक्रमाला लाभलेला भरघोस प्रतिसाद !

८ अ. ‘या कार्यक्रमासाठी फारतर १०० जिज्ञासूंची नोंदणी होईल’, असे वाटणे; मात्र गुरुकृपेने १ सहस्र १०० पेक्षा अधिक लोकांनी नोंदणी करणे, ‘यू ट्यूब’वरील हे चलत्’चित्र ११ सहस्रांहून अधिक वेळा पहाण्यात येणे आणि ‘साम्सा’च्या यापूर्वीच्या कुठल्याही कार्यक्रमापेक्षा या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळणे : या कार्यक्रमासाठी मी १०० पेक्षा अधिक नोंदणी प्राप्त होण्याची आशा केली नव्हती. आमच्या सोशल मिडियाची दर्शकसंख्याही (reach) फार चांगली नव्हती आणि ‘साम्सा’चे फारच अल्प सदस्य या कार्यक्रमाची ‘पोस्ट’ पुढे पाठवत होते. बहुसंख्य सदस्य या विषयामध्ये कुठलाही रस किंवा उत्साह दाखवत नव्हते; मात्र १ सहस्र १०० हून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. ‘यू ट्यूब’वरील हे चलत्’चित्र ११ सहस्रांहून अधिक वेळा पहाण्यात आले आणि भेट देणारेही बरेच जण होते. ‘साम्सा’च्या यापूर्वीच्या कुठल्याही कार्यक्रमाला लोकप्रिय पाहुणे वक्ते असतांनाही श्रोत्यांचा एवढा चांगला प्रतिसाद लाभला नव्हता. केवळ परात्पर गुरु डॉक्टर आणि ईश्‍वर यांच्या कृपेनेच या कार्यक्रमाला एवढा चांगला प्रतिसाद लाभला.

९. ही सेवा आरंभ केल्यावर कोरोना रुग्णसेवेसाठी जाऊन अलगीकरणात रहावे लागणे, त्या वेळीही सेवेतील चैतन्यामुळे पुष्कळ आनंद मिळणे

प्रत्यक्षात १५ दिवसांपूर्वी ही सेवा आरंभ झाली. तेव्हा मला कोरोनाच्या रुग्णसेवेसाठी जावे लागले आणि त्यानंतर अलगीकरणामध्ये रहावे लागले, तरीही मला सेवेतील चैतन्य मिळून आनंदाची अनुभूती येत होती. शेवटी १.११.२०२० या दिवशी ही सेवा पूर्ण झाली. मला परात्पर गुरु डॉक्टरांचा पुष्कळ आशीर्वाद मिळाला आणि ‘मी केव्हा एकदा आश्रमात जाऊन पोचते ?’, असे मला वाटले.

१०. कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी बाह्य रुग्ण विभागात गेल्यावर पुष्कळ आवरण जाणवणे, रुग्णांच्या दुखण्यांचे आकलन न होणे, तेव्हा ‘खरा आनंद सेवेतूनच मिळतो’, असे लक्षात येणे आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करणे

दुसर्‍या दिवशी मी बाह्य रुग्ण विभागात (‘ओपीडी’त) गेले. तेव्हा मला चांगले वाटत नव्हते. मी पुष्कळ दिवसांनंतर बाह्य रुग्ण विभागात गेल्यामुळे मला रुग्णांच्या दुखण्यांचे आकलन होत नव्हते (केसेस समजत नव्हत्या) आणि माझ्यावर आवरणही आले होते. त्या वेळी ‘सेवेतच आनंद आहे. येथे कसे राहू ? काय करू ?’, असे मला वाटले. नंतर माझ्याकडून परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना झाली, ‘आपणच मला या परिस्थितीमध्ये ठेवले आहे. ‘यातूनच माझी साधना कशी होईल आणि त्याचा आनंद मला कसा घेता येईल ?’, ते आपणच मला सांगावे.’

११. या ‘वेबिनार’नंतर उपलब्ध झालेल्या सेवेच्या संधी

११ अ. एका सहकार्‍याच्या आईला पुष्कळ वर्षे त्वचेच्या समस्या असणे, त्यावर ‘मानसशास्त्रीय उपाय आणि नामजप सांगावा ?’, याविषयी मनात विचार येणे; मात्र ते सांगण्यापूर्वी ‘विचारून मग सांगावे’, असे ठरवणे : त्या दिवशी सायंकाळी मी आमच्या गटातील एका सहकार्‍याला ‘वेबिनार’विषयी अभिनंदन करण्यासाठी भ्रमणभाष केला. त्या वेळी त्याने त्याच्या आईला होणार्‍या त्वचेच्या समस्यांविषयी सांगून ‘तुम्ही तिच्याशी बोलू शकता का ?’, असे विचारले. त्याच्या आईशी बोलल्यानंतर त्यांना पुष्कळ वर्षांपासून ‘प्रुरायगो’ नावाचा त्वचाविकार असल्याचे लक्षात आले. ‘यावर वैद्यकीय उपचारांसह मानसशास्त्रीय उपचारही करणे आवश्यक असून ‘योग्य प्रतिक्रिया’ या ‘अ २’ या पद्धतीने स्वयंसूचना देण्यास सांगितले पाहिजे’, असे मला जाणवले. ‘या स्वयंसूचनेमुळे त्यांचे लक्ष खाजेकडे न जाता नामजपाकडे केंद्रित होऊ शकेल. त्यासह ‘त्यांना कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे दोन्ही नामजपही करायला साांगितले पाहिजेत’, असे मला वाटले; मात्र मी ‘असे सांगणे योग्य होर्ईल का ?’, हे पुढे विचारून घेऊन बोलावे’, असा विचार केला.

११ आ. दुसर्‍या दिवशी बाह्य रुग्ण विभागात आलेल्या एका मुलीला त्वचेची तशीच समस्या असणे, तिला स्वयंसूचनांविषयी सांगण्यास वरिष्ठांनी विरोध दर्शवणे; म्हणून तिला तेथे काही न सांगता तिचा संपर्क क्रमांक घेणे : दुसर्‍या दिवशी बाह्य रुग्ण विभागात १८ – २० वर्षें वयाची एक रुग्ण आली होती. तिलाही तीच समस्या होती. तेव्हा मी तिला ‘तिच्या मनाच्या स्तरावरही उपचार घेणे आवश्यक आहे’, असे सांगत असतांना ती माझे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती. माझ्यासह तिथे एक वरिष्ठ आधुनिक वैद्य बसले होते. ते म्हणाले, ‘‘हे सर्व दुय्यम आहे. आता समुपदेशन करण्याची आवश्यकता नाही.’’ त्यामुळे मी तिला अधिक काही बोलले नाही. नंतर मी त्या रुग्णाला विभागाच्या बाहेर जाऊन मी तिचा संपर्क क्रमांक घेतला.

​या दोन्ही प्रसंगांवरून लक्षात आले, ‘परात्पर गुरुदेवांची किती कृपा आहे !’ ‘ते प्रत्येक परिस्थितीमध्ये मला सेवेची संधी कशी देत आहेत ?’, याची मला जाणीव झाली आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– डॉ. श्रिया साहा, कोलकाता (नोव्हेंबर २०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक