६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. अमोघ हृषिकेश नाईक (वय २ वर्षे ७ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अमोघ नाईक एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. अमोघ नाईक

१. ‘चि. अमोघ त्याची खेळणी आणि पायमोजे रात्री झोपण्यापूर्वी लाकडी कपाटातील एका खणात ठेवतो.

२. बाळकृष्णाप्रमाणे खोड्या करणे

अमोघची पणजी जेव्हा नामजपाला बसायची, तेव्हा तिच्याकडे पाहून तो हसायचा आणि हळूच तिची जपमाळ ओढून घ्यायचा आणि ती लपवण्याची कृती करून हसायचा; पण तो ती माळ लगेच तिला परतही करायचा. त्याच्या पणजीला अंथरुणावर एकही सुरकुती पडलेली आवडत नसे; पण अमोघ बाकी कुणाचेही अंथरूण न विस्कटता पणजीचे अंथरूण विस्कटायचा आणि तिच्या उशीवर जाऊन झोपायचा अन् तिच्याकडे बघून हसायचा. पणजीलाही त्याच्या खोड्यांचे कौतुक वाटायचे. ही दोन्ही सूत्रे संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘या तर बाळकृष्णाच्या खोड्या आहेत !’’

३. सात्विकतेची आवड

अ. अमोघला पांडुरंगाची भक्तीगीते आवडतात. सकाळी उठल्यावर तो ध्वनीक्षेपकावर भजने लावण्यासाठी खुणावतो. झोप आल्यावर तो त्याच्या आजीकडे जाऊन तिला ‘पहावा विठ्ठल…’ हे भजन लावण्यासाठी खुणावतो.

आ. रामनाथी आश्रमात आल्यावर त्याला स्वागतकक्षासमोरील यज्ञकुंडाकडे आणि मारुति मंदिराकडे जायचे असते. ‘तिथेच बसून खेळायचे आहे’, असे तो खुणावत असतो.

४. बाबांविषयी विचारल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहाणे

आमच्या घरासमोर साधक श्री. महेश पळणीटकर यांचे घर आहे. त्यांच्या घरी परात्पर गुरुदेव आणि प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे भिंतीवर समोरासमोर लावली आहेत. एरव्ही ‘अमोघचे बाबा कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर तो माझ्याकडे पहातो; पण मी श्री. पळणीटकर यांच्याकडे असतांना जर त्याला हा प्रश्‍न विचारला, तर तो प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहातो.

५. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता

अमोघच्या जन्मापूर्वी मला संतांनी ४ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले होते. काही मास (महिने) ते नियमित झाले; पण सध्या माझ्यातील स्वभावदोषांमुळे त्यात खंड पडला होता आणि अनियमितता होती. या काळात माझ्या लक्षात आलेली गोष्ट, म्हणजे ज्या दिवशी माझे न्यूनतम २ घंटे नामजपादी उपाय होतात, त्या दिवशी अमोघ माझ्याशी मनापासून खेळतो, उदा.  माझ्या मांडीवर स्वतःहून येऊन बसणे, त्याची खेळणी घेऊन माझ्यापुढे येऊन मला त्याच्याशी खेळायला सांगणे आणि त्याला उचलून घेण्यासाठी मला खुणावणे; मात्र उपाय झाले नसल्यास मला त्याच्याशी स्वतःहून खेळावे लागते. त्या वेळीही तो मनापासून खेळत नाही. यावरून ‘आज माझा नामजप झाला नाही.’, याची मला जाणीव होते.’

– श्री. हृषिकेश नाईक (वडील), फोंडा, गोवा. (१२.१२.२०१८)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक