
पुणे – येरवडा येथील बशीद शेख या व्यक्तीवर एका पोस्टद्वारे धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. इन्स्टाग्रामवर औरंगजेबाशी संबंधित ३ रील्स (‘रील्स’ म्हणजे काही सेकंद ते मिनिटांचा व्हिडिओ) सिद्ध करण्यात आले. यांमध्ये आक्षेपार्ह आणि मानहानीकारक लिखाण होते, ज्यामध्ये थोर व्यक्तींना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीने समाजामध्ये धार्मिक तणाव आणि दुही निर्माण करण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ठेवले अन् त्यासमवेत अनुचित ‘चॅटिंग’ (संवाद) ही केल्याचे प्रथमदर्शनी समजते. ही घटना २१ मार्चला उघडकीस आली असून २२ मार्चला अधिकृतपणे गुन्हा नोंदवण्यात आला.
दुसर्या प्रकरणात खडक पोलीस ठाण्याच्या परिसरातील चमनशहा दर्ग्याजवळ आक्षेपार्ह आणि वादग्रस्त छायाओळीसह औरंगजेबाचे चित्र, तसेच ‘रील्स’ ठेवल्याच्या प्रकरणी ३ गुन्हे नोंदवण्यात आले. या पोस्टमध्ये सहभागी असलेल्या ३ इन्स्टाग्राम खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये इरफान खान, शेख अर्ब या दोघांचा समावेश आहे.
तिसर्या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या परिसरात एका व्यक्तीने विशिष्ट व्यक्तीचे छायाचित्र आणि गाणे इन्स्टाग्रामवर लावून हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या. या प्रकरणात विक्रम प्रेमचंद सोहेल शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकायाचा सरळ अर्थ होतो की, संबंधित मुसलमानांचा औरंगजेब हा आदर्श आहे. यातून त्यांची मानसिकता काय आहे आणि त्यांच्या मनात हिंदुद्वेष कसा भिनलेला आहे, हे वेगळे सांगायला नको. उद्या यांच्याकडून हिंदूंवर आक्रमण केले गेले, तर आश्चर्य वाटू नये ! यामुळेच औरंगजेबाची कबर तोडून सरकारने त्या विखारी मानसिकतेचे खच्चीकरण करून समाजहित जपावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! |