|

मुंबई – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे रचून ते कार्यक्रमात सादर केले होते. या प्रकरणी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी खार येथील कुणालच्या ‘हॅबिटॅट कॉमेडी क्लब’ची तोडफोड केली.
कुणाल कामरा जे म्हणाले ते जर अवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे.
पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली.
कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला… pic.twitter.com/mVdESopkqT
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 24, 2025
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याविषयी ‘एक्स’द्वारे प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाल्या, ‘‘याला गुंड प्रवृत्ती म्हणतात. आधी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवून कारवाई करा. कामराच्या विरोधात कायद्याने लढणे अपेक्षित आहे. आपण लोकशाहीत रहातो. येथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही.’’