महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर रथातून आलेल्या दैवी नादांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉक्टरांना दिलेल्या श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर रथातून आलेल्या दैवी नादांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

​‘१६.६.२०२० या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांनी प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉ. आठवले यांना दिलेल्या श्रीकृष्णार्जुनाच्या चांदीच्या रथाचे पूजन करण्यास सांगितले. हे पूजन चालू असतांना या रथातून दोन प्रकारचे दैवी नाद ऐकू आले. या दैवी नादांचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर त्यांच्या संदर्भात पुढील ज्ञान मिळाले.

टीप १ – विविध देवतांची शक्ती नादशक्तीच्या रूपाने रथातील दैवी नादांना साहाय्यक असणे’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०२०, रात्री १०.४५)

कु. मधुरा भोसले

श्रीकृष्णार्जुनाच्या रथाच्या पूजनापूर्वीचा ध्वनीकंपन आलेख
पूजनानंतरचा दैवी नाद आल्यावर त्याचा ध्वनीकंपन आलेख

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

​‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सूक्ष्मातून दैवी नाद ऐकू येणे आणि त्या अनुषंगाने अन्य घडामोडी घडणे आदींविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’ – व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. रूपेश रेडकर,

ई-मेल : [email protected]

• सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक